Makar Sankranti : 14 की 15 जानेवारी मकर संक्रांती यंदा कधी साजरी केली जाईल ? जाणून घ्या

नवीन वर्षातला पहिलाच येणारा सण म्हणजेच मकरसंक्रांत.
Makar Sankranti
Makar SankrantiSaam Tv
Published On

Makar Sankranti : नवीन वर्षातला पहिलाच येणारा सण म्हणजेच मकरसंक्रांत (Makar Sankranti). हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खास करून महिलांना मध्ये या सणाचा खुप उत्साह असतो.

तीळ गुळ बनवले,नविन कपडे(काळे) खरेदी करणे,हळदी कुंकुचा कार्यक्रम ठेवणे,हे सर्व मकर संक्रांतीत महिला (Women) आनंदाने करतात. या सणात काळ्या कपडयांना अधिक महत्व दिले जाते.

Makar Sankranti
Makar Sankranti Recipe : मकर संक्रांतीला बनवा चवदार अशी तीळाची चिक्की !

मकरसंक्रांत हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. साधारणपणे मकर संक्रांती दरवर्षी 14 जानेवारीला साजरी केली जाते. मात्र ग्रहांच्या बदलामुळे यंदा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण १५ जानेवारीला साजरा होणार आहे.

जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत ही देशातील विविध राज्यांमध्ये अनेक नावांनी ओळखली जाते. जसे उत्तरायण, पोंगल, खिचडी इ. देशभरात मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून तीळ आणि खिचडी खाण्याचे महत्त्व आहे. या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ (Food) तयार केले जातात, परंतु, विशेषतः गुळाचे तिळाचे लाडू आणि खिचडी खाणे महत्त्वाचे आहे.

1. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

  • 2023 शुभ मुहूर्त:शुभ वेळ - मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी सकाळी 07:15 ते संध्याकाळी 05:46 पर्यंत.

  • अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:09 ते दुपारी 12:52 पर्यंत.

  • विजय मुहूर्त - दुपारी 02:16 ते दुपारी 02:58 पर्यंत.

2. तीळ गुळचा लाडूची रेसिपी

साहित्य - गूळ,तीळ,तूप,वेलची,पावडर,बदाम क्रश,काजू क्रश

Til Ladu
Til Laducanva

कृती

  1. गूळ तीळ लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम तीळ कढईत भाजून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

  2. नंतर गॅसवर तवा ठेवून त्यात तूप घालून गरम करा.

  3. आणखी गूळ घाला आणि पूर्णपणे वितळू द्या.

  4. आच कमी करा, गूळ वितळल्यानंतर त्यात तीळ, वेलची पूड, ठेचलेले बदाम आणि काजू घाला आणि चांगले मिक्स करा. आता गॅस बंद करा.

  5. मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताला ग्रीस करून लाडू बनवा. हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यात 15-20 दिवस साठवून ठेवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com