Makar Sankranti 2024 : संक्रांतीला दुचाकी चालवताना पतंगाचा मांजा ठरू शकतो जीवघेणा, कशी घ्याल काळजी?

Makar Sankranti : पतंगाच्या मांजाने लोकांची मान कापल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पण ही जीवघेणी तार कशी टाळता येईल हे तुम्हाला माहीत आहे का? मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुमच्या शहरात पतंग उडत असतील.
Makar Sankranti 2024
Makar Sankranti 2024 Saam Tv

Safty Driving Tips :

पतंगाच्या मांजाने लोकांची मान कापल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पण ही जीवघेणी तार कशी टाळता येईल हे तुम्हाला माहीत आहे का? मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुमच्या शहरात पतंग उडत असतील, तर तुम्ही दुचाकी चालवण्यापूर्वी तुमच्या दुचाकी किंवा स्कूटरला (Scooter) सेफ्टी गॅझेट लावू शकता.

असे काही प्रसंग येतात जेव्हा आकाशात पतंग उडताना दिसतात. देशात अशी काही शहरे आहेत जिथे लोक केवळ 15 ऑगस्टलाच नाही तर मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशीही पतंग उडवतात. पण अनेक वेळा पतंगाचा मांजा दुचाकीस्वारांसाठी जीवघेणी ठरते, अशा परिस्थितीत वाहन चालवताना मांजापासून स्वतःचा बचाव कसा करायचा?

मांजामुळे अनेकवेळा दुचाकी किंवा स्कूटरस्वार दुचाकी चालवताना मानेला दुखापत होऊन मृत्यूमुखी पडतात. यावेळी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता ते जाणून घेऊया.

अशा घटनांमुळे सरकारने चायनीज मांजावर याआधीच बंदी घातली आहे, मात्र तरीही काही लोक चायनीज मांजा छुप्या पद्धतीने विकतात. पतंग उडवताना दुचाकी चालवताना तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी एक सोपी युक्ती वापरू शकता.

स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ही गोष्ट वापरा

तुम्ही बाईक किंवा स्कूटर चालवत असाल तर, तुम्ही पातळ स्टेनलेस स्टीलची सुरक्षा वायर लावू शकता. ही सुरक्षा वायर तुमच्या दुचाकीच्या हँडलवर बसते, जर कोणी मांजा तुमच्या दिशेने आला आणि या वायरला धडकला तर तुम्हाला कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com