Mahaparinirvan Din 2022 : महापरिनिर्वाण दिनी अभिवादन का केले जाते ?

बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन स्मृतिदिन म्हणून ओळखला जातो.
Mahaparinirvan Din 2022
Mahaparinirvan Din 2022Saam Tv
Published On

Mahaparinirvan Din 2022 : राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. ते महान समाजसुधारक व अभ्यासक होते. ६ डिसेंबरला त्यांची पुण्यतिथी असते.

बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आणि 14 एप्रिल रोजी भारतात (India) आंबेडकर जयंती साजरी (celebrate) केली जाते. या दिनी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे, कर्तृत्वाचे स्मरण केले जाते. दलित समाजासाठी त्यांनी मोठे योगदान दिले त्यासाठी बाबसाहेब हे त्यांच्यासाठी देवापेक्षा कमी नाही.

Mahaparinirvan Din 2022
Mahaparinirvan Din 2022: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण; 6 डिसेंबरला होणार थेट प्रक्षेपण

महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय ?

परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण. हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व व ध्येय आहे. निर्वाण प्राप्त करण्यासाठी अत्यंत सद्गुणी व धार्मिक जीवन जगावे लागते. भगवान बुद्धांच्या मृत्यूलाही महापरिनिर्वाण असे म्हटले जाते.

मंत्रांचा अर्थ

बुद्धं शरणं गच्छामि।

धर्मं शरणं गच्छामि।

संघं शरणं गच्छामि।

  • बुद्ध म्हणजे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, ज्ञानाकडे नेणारा. मनाच्या उच्च जाणीवेकडे.

  • धम्म हा 'येथे - आणि - आता' आहे, तो काही बौद्धिक लेखन किंवा कशाचाही आश्रय घेत नाही.

  • संघ म्हणजे समुदाय, समुदाय जिथे लोक आधार देतात, एकमेकांना ध्यानात मदत करतात. समुदाय असणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही निराश असाल, जेव्हा तुम्हाला तुमचे 100% वाटत नसेल किंवा तुम्ही कुठेतरी अडकलेले असाल तेव्हा समुदाय तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तेथे असेल.

महापरिनिर्वाण दिनी अभिवादन का केले जाते ?

बाबासाहेबांनी दलित समाजाची स्थिती सुधाण्यासाठी मोठे योगदान दिले. अस्पृश्यतेसारखी प्रथा देखील त्यांनी मोडून काढली. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ६६ वी पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखली जाणार आहे. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक बोधिसत्त्व म्हणून ओळखतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com