Lumpy Virus : लम्पी त्वचा रोग काय आहे ? तो कसा होतो ? त्याचा मनुष्याला धोका कितपत ?

लम्पी आजार कसा होतो ? त्याची लक्षणे कोणती ?
Lumpy Virus
Lumpy VirusSaam TV
Published On

Lumpy Virus : मागच्या काही काळात कोविड-१९, मंकीपॉक्स, स्वाइन फ्लू, मलेरिया, डेंगू व अनेक संसर्गजन्य आजाराला आपण तोंड देत आले आहोत. कोरोनाचे सावट कमी होत असताना पुन्हा एकदा एका नवीन आजारांने डोकेवर काढले आहे.

या आजारांचे थैमान आठ राज्यापेक्षा अधिक राज्यात दिसून येत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये याचा कहर वाढत असून पशूपालन वर्गावर पुन्हा एकदा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा आजार त्वचेच्या विकारासंबंधी असून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे.

Lumpy Virus
Dengue Fever : पुन्हा होऊ शकतो का डेंगूचा संसर्ग ? झाला तर, किती वेळा होईल ?

लम्पी त्वचा रोग नेमका काय आहे ?

लम्पी हा आजार प्रामुख्याने त्वचेचा (Skin) संसर्गजन्य असून त्याचा प्रामुख्याने जनांवरांमध्ये दिसून येत आहे. हा रोग सध्या किटकांपासून पसरतो. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. या आजारांत जनावरांच्या शरीराला गाठी येतात आणि पुढे गाठींचा आकार मोठ होत जातो. हा व्हायरस जास्त दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होण्याची शक्यता अधिक आहे.

या आजाराची लक्षणे -

या आजारात जनावरांना प्रथम ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यांतून सतत पाणी येऊ लागते, तोंडातून लाळ पडते, शरिरावर छोट्या गाठी यायला लागतात. जानावर दूध कमी देते, यामुळे जनावरांची प्रकृती अधिक जास्त खराब होते.

लम्पी व्हायरसवर उपाय

- लम्पीची लागण झालेल्या जनानरांना वेगळे ठेवा.

- माश्या, डास, गोचीड यांना मारण्याचे उपाय शोधा. तसेच हे जनावरांच्या आजूबाजूला फिरणार नाही याची काळजी घ्या.

Lumpy Virus
Diabetes Diet Plan : वाढत्या साखरेच्या पातळीला नियंत्रणात ठेवायचे आहे ? तर, ताटात ठेवू नका 'हे' पदार्थ

- जनावरांचा मृत्यु झाल्यास मृतदेह मोकळ्या जागेवर न सोडता पुरून टाकावा किंवा जाळून टाकावा.

या आजाराचा धोका मनुष्याला किती आहे ?

लम्पी त्वचा रोग सध्या वेगाने पसरत असला तरी हा मानवामध्ये पसरत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. जर हा आजार (Disease) झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात असल्यासही मानवामध्ये हे संक्रमण होत नाही. लम्पी त्वचा रोगामुळे मृत्यू दर १ ते २ टक्के आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com