Laughing Benefits : शरीरात ऑक्सिजन वाढवण्याचा सोपा आणि गमतीशीर मार्ग आजच जाणून घ्या, सगळे आजार दूर पळतील

Benefits Of Laugh : प्रदूषणाचा आपल्या फुफ्फुसांवर परिणाम होतो त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो.
Laughing Benefits
Laughing BenefitsSaam Tv
Published On

Health Tips :

प्रदूषणाचा आपल्या फुफ्फुसांवर परिणाम होतो त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हसणे नैसर्गिक थेरपीसारखे काम करते. मोकळेपणाने हसल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. मोठ्याने हसणार्‍या लोकांचे एकंदरीत आरोग्य खूप चागले असते.

शरीर निरोगी (Healthy) ठेवायचे असेल तर मनमोकळेपणाने हसायला शिका. तुमची ही सवय वाढत्या ताणतणाव आणि बिघडत चाललेल्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर तुमचे आरोग्य सुधारू शकते. विषारी हवा आणि वायू प्रदूषणाचे परिणाम टाळण्यास देखील मदत करू शकते. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Laughing Benefits
Chanakya Niti On Healthy Life : नीतीशास्त्रानुसार निरोगी जीवनासाठी आहार अत्यंत आवश्यक आहे, जाणून घ्या

हसल्याने ऑक्सिजन वाढतो

जे लोक मोकळेपणाने हसतात त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची (Oxygen) पातळी चांगली असते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. हसताना, आपले शरीर दीर्घ श्वास घेते आणि श्वास सोडते. हसणे हा एक व्यायाम आहे जो शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह राखतो. जोरात हसल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळीही वाढते. तुम्ही दिवसभर उर्जेने भरलेले राहता.

हसल्याने रक्तदाब नियंत्रित राहते

मोकळेपणाने हसल्याने (Laugh) शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. संशोधनात असे समोर आले आहे की जे लोक खूप हसतात त्यांचा रक्तदाबही नियंत्रणात राहतो. डॉक्टरही लोकांना हसण्याचा सल्ला देतात. पार्कमध्ये लोकांना हसताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. जे हसण्याचा व्यायाम करतात.

Laughing Benefits
Chanakya Niti On Health : निरोगी जीवन जगण्यासाठी नीतिशास्त्रातील हे सल्ले ठरतील उपयोगी, जाणून घ्या

हसण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते

आजकाल लोक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक गोष्टी करतात. यासाठी तुम्हीही मोकळेपणाने हसायला सुरुवात केली पाहिजे. मोकळेपणाने हसल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हसण्यामुळे शरीरात अँटी व्हायरल आणि इतर अनेक संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो.

हसण्याने ताणतणाव कमी होतो

डॉक्टर त्रासलेल्यांना हसण्याची थेरपी सुचवतात. हसण्याने मानसिक आणि शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. तणावापासून दूर राहायचे असेल तर मनमोकळेपणाने हसायला शिका आणि आनंदी राहा. यामुळे नैराश्य, चिंता आणि तणाव कमी होतो. जे आजकाल प्रत्येक समस्येचे मूळ बनत आहेत.

Laughing Benefits
Laughing Health Benefits: एक स्माईल प्लिज! हसण्याचे 'हे' फायदे ऐकून व्हाल चकित

तुम्हाला पाठदुखीपासून आराम मिळेल

हसण्याचे फायदे फक्त एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत, तर यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो. मोकळेपणाने हसल्याने स्पॉन्डिलायटिस आणि पाठदुखीपासून आराम मिळतो. जर पाठदुखीपासून आराम मिळत असेल तर तुम्ही दररोज 10 मिनिटे हसले पाहिजे. हे एंडोर्फिन हार्मोन तयार करते जे तुमचे संपूर्ण शरीर आनंदी ठेवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com