स्वयंपाकघरातील केशर कसे वापरायचे जाणून घ्या

स्वयंपाकघरात अनेक मसाल्यांपैकी महत्त्वाचे व आयुर्वेदातील औषधी असे केशर.
How to use saffron, Kitchen tips in Marathi
How to use saffron, Kitchen tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्वयंपाकघरात अनेक मसाल्यांपैकी महत्त्वाचे व आयुर्वेदातील औषधी असे केशर. केशर हे दिसायला जरी लहान असले तरी त्याचे अनेक गुणधर्म आहेत. पदार्थांची चव वाढवण्यापासून ते अनेक आजारांवर मात करण्यासाठी बहुगुणी ठरले जाते. (Kitchen tips in Marathi)

हे देखील पहा -

सुगंध आणि चवीमुळे हा मसाला महाग असला तरी आपल्यापैकी अनेकांना केशर वापरायला आवडते. केशर हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. केशरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे आढळतात. तिखटापासून ते गोडापर्यंत अनेक पदार्थामध्ये त्याचा वापर केला जातो. केशर हा अतिशय सुवासिक मसाला असून तरी तो अतिशय नाजूक आहे. स्वयंपाक करताना केशर चुकीच्या पद्धतीने वापरल्यास केशराचा सुगंध कमी होतो. त्यामुळे त्याचे पोषण तत्व देखील मिळत नाही. केशर योग्य पध्दतीने कसे वापरायचे हे जाणून घ्या.

केशरचा वापर कसा कराल

१. केशरांचा आपण योग्यप्रकारे वापर केल्यास शरीरात रक्ताच्या गाठी जमत नाही तसेच रक्तवाहिन्यांममधील अडथळा दूर होतो आणि रक्तदाब कमी होतो. केशरमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते.

How to use saffron, Kitchen tips in Marathi
रात्रीच्या वेळी भूक लागत असेल तर, हे पदार्थ खा मिळेल पोषण तत्व

२. पदार्थ शिजवताना त्याच्या तापमानामुळे मसाल्यांची चव काही अंशी निघून जातो. केशरचा वापर अन्नपदार्थात करताना भिजवून त्याचा वापर करावा. आपण त्याला पाण्यात (Water) किंवा दूधात काही वेळ भिजवून त्याचा वापर करु शकतो.

३. केशर बारीक करुन देखील त्याचा वापर आपण करु शकतो. केशर तळून त्याला दूधात किंवा पाण्यात भिजवून त्याचा वापर आपण बिर्याणीमध्ये करु शकतो. त्यामुळे बिर्याणीची चव वाढते.

४. द्रव पदार्थ बनवत असताना केशर भिजवण्यापेक्षा आपण केशरला त्या पदार्थामध्ये सरळ घालू शकतो. द्रव पदार्थ बनवताना जास्त वेळ लागतो त्यामुळे केशरमध्ये असणारे अनेक गुणधर्म त्यात उतरतात व पदार्थाला चव येते.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com