

भारतातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लाँच करण्यात आली आहे. ही बाईक हार्ले डेविडसनसारखी दिसते. ही इलेक्ट्रिक बाइक एका चार्जवर 180-220 किमीची प्रवास करु शकते, असा दावा कंपनीनेच केला आहे. यात 4000 वॅटची मोटर आहे. कंपनीने ही बाईक गार्नेट रेड, डीप ब्लू आणि जेट ब्लॅक या तीन कलर व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.68 लाख रुपये आहे.
या गाडीमध्ये IC इंजिन क्रुझर वापरण्यात आले आहे, जे यापूर्वी हार्ले डेव्हिडसन आणि रॉयल एनफिल्ड इत्यादींमध्ये वापरले गेले आहे. या बाईकमध्ये बिग ग्रॉसर व्हील, क्रोम एक्सटीरियर्स आणि फाइन पेंट जॉबचा वापर करण्यात आला आहे. या मोटरसायकलमध्ये 4kW बॅटरी वापरली गेली आहे, जी भारतातील सर्वात मोठी दुचाकी बॅटरी आहे. बाईक एका चार्जवर 180-200 किमी ड्रायव्हिंग रेंज देते. यात 4000 वॅटची मोटर आहे.
बाईकमधील फिचर्स?
या मोटरसायकलला ब्लूटूथ साउंड सिस्टीम, साइड स्टँड सेन्सर, क्रूझर कंट्रोल फीचर्स, अँटी थेफ्ट लॉकिंग सिस्टीम आहे. तसेच, यात ड्युअल स्टोरेज बॉक्सचा पर्याय समाविष्ट आहे. युजर्सची सोय लक्षात घेऊन त्यात आरामदायी सीट बसवण्यात आली आहे. तसेच यामध्ये ट्रिपल हेड लॅम्पचा वापर करण्यात आला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.