iPhone New Update : Apple चा ग्राहकांना झटका ! ही सर्व्हिस होणार लवकरच बंद, लगेच करा हे काम

iPhone new service close : Apple कंपनीची सर्वात लोकप्रिय सेवा होती, जी आता बंद होणार आहे.
iPhone New Update
iPhone New UpdateSaam Tv

My Photo Stream Service Close : हल्ली Apple फोन वापरणारे ग्राहक जगभरात अधिक आहे. काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की, अॅपलचे नवे प्रोडक्ट हे टाटा कंपनी बनवणार आहे. अशातच कंपनीने ग्रहकांना मोठा झटका दिला आहे.

अॅपल (Apple) यूजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. अॅपलने लवकरच माय फोटो स्ट्रीम सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहीती स्वत: अॅपल कंपनीने दिली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार, माय फोटो स्ट्रीम सेवा 26 जानेवारी 2023 नंतर वापरता येणार नाही. ही कंपनीची (Company) सर्वात लोकप्रिय सेवा होती, जी आता बंद होणार आहे.

iPhone New Update
Tata Will Manufacture iPhone 15: अभिमान! प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा आयफोन आता भारतीय कंपनी बनवणार.. 'टाटा'चे मोठे पाऊल..

1. 30 दिवसांचा घेता येईल बॅकअप

अॅपलने सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या माय फोटो स्ट्रीम सेवेवर अपलोड केलेल्या सर्व फोटोंचा बॅकअप घेण्यास सांगितले आहे. माय फोटो स्ट्रीम हे अॅपलचे फ्री वैशिष्ट आहे. जे वापरकर्त्यांना iCloud वर 30 दिवस फ्रीमध्ये प्रवेश देते. ज्यामुळे आपण त्याचा फोटोंचा बॅकअप घेऊ शकतात. तुम्ही माय फोटो स्ट्रीम सेवेद्वारे तुमचे फोटो iCloud वर अपलोड करू शकता. त्यानंतर, तुम्ही तुमच्या iPhone, iPad, iPod touch, Mac आणि PC वर iCloud चा त्याचा वापर करु शकता

2. 26 जुलै 2023 पूर्वी स्टोर डेटा (Data)

  • Apple ने सांगितले की, 26 जून 2023 पासून, वापरकर्त्यांना iCloud वर फोटो अपलोड करण्याची सुविधा मिळणार नाही आणि 26 जुलै 2023 पासून ही सेवा पूर्णपणे बंद होईल.

  • त्यामुळे वापरकर्त्याने याआधी त्याचा डेटा स्थानिक स्टोअरमध्ये सेव्ह करायला हवा.

  • हा डेटा सेव्ह करण्यासाठी तुमच्याकडे साधारणत: २ महिन्यांचा कालावधी आहे.

  • 26 जुलै 2023 पूर्वी तुम्ही तुमचा डेटा सेव्ह करु शकता. यानंतर तुमचा डेटा डिलीट करण्यात येईल.

  • या परिस्थितीत, वापरकर्त्यांकडे त्यांचा फोटो डेटा हार्ड डिस्क किंवा इतर वैयक्तिक स्टोरेज सिस्टमवर सेव्ह करण्याचा पर्याय देखील आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com