देशातील सर्वात मोठा LIC IPO गुंतवणूकदारांसाठी खुला; जाणून घ्या महत्वाची माहिती

पाॅलिसीधारकांना या भागखरेदीवर 60 रुपये प्रतिसमभाग सवलत
LIC IPO information in Marathi, LIC IPO GMP Status
LIC IPO information in Marathi, LIC IPO GMP StatusSaam Tv

LIC IPO: देशातील सर्वात मोठा IPO LIC IPO किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदार या सरकारी कंपनीच्या IPO मध्ये आजपासून 9 मे पर्यंत गुंतवणूक करू शकतील. शेअर्सचे वाटप 12 मे रोजी होईल आणि LIC IPO ची स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट 17 मे रोजी होईल.

LIC IPO शी संबंधित महत्वाची माहिती; (LIC IPO information in Marathi)

- Public offering (म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी अर्ज) - 4 ते 9 मे
- प्राइस बँड (LIC IPO Price band): 902 ते 949 रु.
- लॉट साइज (LIC IPO Bid lot size): एक लॉटमध्ये 15 शेअर्स .
- इश्यू साइज (LIC IPO Issue size) - 22.13 कोटी शेअर्स (एकूण शेअर्सच्या 3.5%)

LIC IPO information in Marathi, LIC IPO GMP Status
Koffee With Karan: बॉलिवूडचे गॉसिप राहणार गुपितच! करण जोहरचा भावनिक पोस्ट लिहून खुलासा

LIC IPO Reservation-

- पॉलिसी धारकांसाठी (Policy holders) - इश्यूच्या 10% म्हणजेच 2.21 कोटी शेअर्स राखीव.

- कर्मचाऱ्यांसाठी 0.15 कोटी शेअर राखीव

- पॉलिसीधारकांसाठी एलआयसी आयपीओ सूट (LIC IPO Discount for Policy Holders) - प्रति शेअर 60 रुपये

- एलआयसी कर्मचार्‍यांसाठी सवलत (LIC IPO Discount for Retail and Employees) - 45 रुपये प्रति शेअर.

किती पैसे गुंतवावे लागतील?

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, एलआयसीच्या आयपीओमध्ये पॉलिसीधारक (Policyholders), एलआयसी कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार अशा तीन श्रेणी निर्धारित करण्यात आल्या आहेत. LIC विमा धारकांना IPO वन लॉटवर 60 रुपये प्रति शेअर सूट देऊन एकूण 13,335 रुपये गुंतवावे लागतील.

तसेच, या IPO मध्ये अर्ज केल्यावर LIC कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 45 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच, वरच्या प्राइस बँडनुसार, त्यांना एका लॉटच्या अर्जावर 13560 रुपये द्यावे लागतील. जे कोणत्याही श्रेणीत येत नाहीत, त्यांना एका लॉटसाठी एकूण 14,235 रुपये मोजावे लागतील.

हे देखील पहा-

LIC IPO च्या GMP मध्ये घट;

दरम्यान, असूचीबद्ध बाजारात (unlisted market) LIC IPO च्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये (GMP) घट झाली आहे. Ipowatch.in नुसार, 4 मे रोजी, LIC IPO चा GMP सुमारे 65 रुपयांवर व्यवहार करत आहे, जो 3 मे रोजी 85 रुपये होता. तर, 30 एप्रिल रोजी, जीएमपी सर्वात जास्त 90 रुपये होता, त्यामुळे पब्लिक इश्यू उघडल्यानंतर, जीएमपीमध्ये घट झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com