मुंबई: करण जोहरचा लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करणच्या (Coffee With Karan) चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. कारण आता कॉफी विथ करणचा सातवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीये. हो! या शो ने आतापर्यंत बॉलीवूड सेलिब्रिटींची अनेक गुपिते, गॉसिप्स उघड केली आहेत. या प्लॅटफॉर्मवर करणने अनेक स्टार्सना आमंत्रित केले असून याद्वारे अनेक रंजक गुपिते लोकांसमोर ठेवली आहेत. आता करणचा हा टॉक शो पुन्हा पाहायला मिळणार नाहीये. खुद्द करण जोहरकडून याची घोषणा करण्यात आली आहे. (Koffee With Karan will not return)
करण जोहरने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही बातमी दिली आहे. त्याने लिहिले- 'हॅलो, कॉफी विथ करण 6 सीझनसाठी माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. मला वाटते की या शोने काही प्रभाव पाडला आहे आणि पॉप संस्कृतीच्या (Pop Culture) इतिहासात एक स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच मी जड अंतःकरणाने जाहीर करत आहे की कॉफी विथ करण आता परत येणार नाही.
करणच्या या अनाउन्समेंट नंतर सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे, तर काहींनी याला चांगले देखील म्हटले आहे. प्राजक्ता कोहली, तनुज विरवानी यांनी शो संपल्यावर आपली निराशा व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले - 'हे खूप दुःखद आहे, KWK माझ्यासाठी आणि इतरांसाठी एक गिल्टी प्लेजर होता.' तर शोच्या एका चाहत्याने ते खोटं आहे असं समजून लिहिलं- 'ही एक प्रँक आहे, नाही का?'. आणखी एका यूजरने लिहिले- 'बॉलिवूडमध्ये आम्हाला त्यांच्यासाठी टॉक शो हवे आहेत.
शोसाठी लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स;
तर, काही लोकांनी शो बंद झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिले- 'इम्प्रेस्ड??? कोणावर, कसला प्रभाव.' दुसऱ्याने 'थँक गॉड' लिहून दिलासा व्यक्त केला. तर, दुसर्या यूजरने लिहिले - 'मला वाटले होते की करण सांगेल की शो परत येत आहे, परंतु कदाचित बऱ्याच विवादांमुळे आणि भूतकाळात जे काही घडले त्यामुळे हा शो संपत आहे.' तर, एकाने लिहिले- 'आजची मोठी बातमी'. एका यूजरने दु:खही व्यक्त केले आणि म्हटले- 'मी कॉफी विथ करणला मिस करेन... पण हार्दिक पांड्या (Hardik Pandya Koffee With Karan) हा शो कायम लक्षात ठेवणार आहे.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.