मुंबई : सध्याच्या काळात लॅपटॉप (Laptop) हा मोबाईल (Mobile) प्रमाणे जरी जीवनावश्यक गोष्टींच्या यादीत नसला तरी तो जीवनावश्यक गोष्टी मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामांसाठी मात्र अत्यंत उपयुक्त आणि गरजेचा आहे. कोरोना महामारी (Corona) आल्यापासून तर बऱ्यापैकी सर्वच कंपनींनी आपल्या कंपनीतील कामगारांना घरुनच काम करण्यास सांगितंले होते आणि तेव्हापासून तर लॅपटॉप हा किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव सर्वांना झाली आहे.
मग ते घरुन काम करणारे शिक्षक असोत वा शिकणारे विद्यार्थी सर्वांनी मोठ्या प्रमाणात लॅपटॉपचा वापर सुरु केला आहे. मात्र नवीन लॅपटॉप लॉकडाऊनमध्ये (LockDown) घेतले असेल तरी काही दिवसांनंतर ते हँग होतात, लवकर सुरु होत नाहीत मग अशावेळी नक्की काय करायला हवं हे अनेक वेळा आपणाला माहित नसंत आणि थोड्याशा गोष्टींसाठी आपण जर लॅपटॉप दुरुस्त करणाऱ्या दुकानदारांकडे गेलो तर ते आपणाला फसवण्याची शक्यता असते आणि हीच तुमची फसवणूक होवू नये. छोटे छोटे प्रॉब्लेम्स कसे सोडवले जाऊ शकतात हे आपण जाणून घेऊयात. (Top tips for phone hanging problem)
जर तुम्ही लॅपटॉपचा जास्त प्रमाणात वापर करत असाल सारखे ऑनलाईन (Online) रहात असाल तर तुमचा लॅपटॉप हँग होण्याची शक्यता असते आणि जर तो वारंवार हँग होत असेल तर त्यासाठी पुढील माहितीप्रमाणे ती हँगची समस्या सोडवा.
अँटीव्हायरस
1 - सर्वात आधी आपल्या लॅपटॉप मध्ये अँटीव्हायरस आहे का? हे चेक करा. नसल्यास तो Install करा कारण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस नसल्यास व्हायरसचा शिरकाव होण्याची शक्यता असते. आणि यामुळे लॅपटॉप वारंवार हँग होतो मात्र अँटीव्हायरस मुळे तुम्ही वापरणाऱ्या बेवसाईट मधून लॅपटॉपमध्ये व्हायरस येण्याची शक्यता संपते.
रॅम आणि स्टोरेज
2 - लॅपटॉपमधील रॅम आणि स्टोरेज वाढवून ते आपण वापरु शकतो कारण अनेकदा कमी रॅम असणे हे लॅपटॉप वारंवार हँग होण्याचे प्रमुख कारण असते. त्यामुळे लॅपटॉपची रॅम जास्तीत जास्त वाढवून घेतला तर लॅपटॉप हँग होण्यीची समस्या संपुष्टात येईल.
लॅपटॉप Update
3 - अनेकदा लॅपटॉप पूर्णपणे अपडेट (Update) न झाल्याने वारंवार हँग होत असल्याची समस्या जाणवते. त्यामुळे लॅपटॉपला वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे. अपडेट केल्याने सिस्टममध्ये नवीन फीचर्स आणि फंक्शन जोडले जातात. त्यामुळे सिस्टमची प्रोसेसिंग स्पीड वाढते.
हे देखील पहा -
जंक फाईल्स Delete करा -
वर सांगितलेल्या माहिती मुळे तुम्हाला लॅपटॉप व्यवस्थित न चालण्याची कारणे समजली आहेत मात्र आता आपण काम करताना लगेच काही उपाय करु शकतो तेही आपण जाणून घेऊयात लॅपटॉप ज्यावेळी हँग होतो त्यावेळी लॅपटॉपमध्ये मोठ्या प्रमाणात जंक फाईल्स जमा झाल्याची शक्यता असते शिवाय त्या जंक फाईल्स पुर्णता निरुपयोगी असतात. त्यामुळे त्या डिलीट करणे खूप महत्वाचे असते आणि त्या पुढील प्रमाणे आपण डिलीट करु शकतो -
1) पहिल्यांदा लॅपटॉपच्या सर्च बार वरती जाऊन Command Prompt ओपन करा - त्यानंतर एक प्रोग्रॅम टाईप विंडो उघडेल ती उघडल्यावरती जंक फाइल डिलीट करण्यासाठी येथे एक कोड टाकावा लागेल. तो पुढील प्रमाणे आहे -
%SystemRoot%\explorer.exe %temp%\
हा कोड आहे तसा कॉपी करुन वापरलात तरी चालेल. हा कोड टाकलात की तुमच्या समोर एक विंडो उघडेल ज्यामध्ये सर्व जंक फाइल्स असतील त्या ctrl A दाबून एकाच वेळी सर्व फाईल्स डिलीट करू शकता. तसंच Delete key किंवा shift + Delete वापरु शकतो ज्यामुळे या फाईल्स Recycling Bin मध्येही जाणार नाहीत.
वरती दिलेला Program आणि कमांड काम करत नसेल तर लॅपटॉपवरील Windows चे चिन्ह असलेले बटण प्रेस करुन R दाबा आणि पुन्हा वरील प्रमाणे तिथे %temp% टाका आणि आलेल्या फाईल्स Delete करा. मात्र तुम्हाला तुमच्या महत्वाच्या फाईल्स हव्या असतील तर मात्र तो प्रॉग्रॅम रन होत असतना Skip या Option वरती क्लीक करा. यानंतर मग ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सिस्टममधील सर्व जंक फाइल्स हटवल्या जातीलल शिवाय आपल्या लॅपटॉपमधील सर्व महत्त्वाच्या फाईल्स जशा आहेत तशाच राहतील.
तसंच जंक फाइल्स Delete केल्यानंतर डिस्क स्पेस देखील मोकळी केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला loadisk कमांड वापरावी लागेल. ही कमांड cleanmgr /lowdisk /e आहे. या सर्व प्रक्रियेनंतर तुमचा पीसी किंवा लॅपटॉप उत्तमरित्या काम करु लागेल.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.