जालना - काल राज्यात 36 हजार कोरोना (Corona) रुग्ण आढळून आले असून आपण आता हळूहळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे. ते जालन्यात (Jalna) बोलत होते. आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवा असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. (Rajesh Tope Latest News)
याशिवाय निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील असा ईशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे. मास्क (Mask) नसेल तर दंड करा,गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले जातील असंही टोपे म्हणाले.
हे देखील पहा -
कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही त्यावेळेत निर्बंध आणता येईल का याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे अहवाल पाठवला जाणार असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असही टोपे म्हणाले.देशात कोरोनाचा विस्फोट झाला असून 8 दिवसांत 1 लाख 17 हजार रुग्ण आढळून आली आहे. यासाठी गर्दी टाळली पाहिजे तरच संसर्ग कमी होईल असंही त्यांनी सांगितलं.
चित्रपट, नाट्यगृह,मंदिरं या ठिकाणी गरज पडली तर निर्बंध लावले जातील. मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे.अनेक जिल्ह्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या ठिकणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे त्यामूळे तो निर्णय घेण्यात आल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
धारावीमध्ये 1 हजार रुपयात लस घेतलयाच प्रमाणपत्र देणारी टोळी पकडली त्यांच्यावर सरकारकडून सक्त कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री (Uddhav Thackeray), माझ्यात आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात बैठक झाल्याचं टोपे यांनी मान्य केलं असून चर्चा होत असतात मात्र अंतीम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात असे देखील टोपे यांनी सांगितले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.