Krishan Kamal Benefits : बदलेल्या जीवनशैलीनुसार व तणावामुळे उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. परंतु, प्रत्येक व्यक्तीला काहींना काही समस्या आहे.
हल्ली उच्च रक्तदाबाचा त्रास हा प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसून येत आहे. त्यात उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना चक्कर येणे आणि डोके फिरणे अशी तक्रार असते. यासोबतच हृदयाचे ठोके जलद होतात आणि छातीत तीव्र वेदनाही होतात.
प्राथमिक स्तरावर उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठ कमी खाणे, संतुलित आहार घेणे, दररोज व्यायाम करणे आणि योग्य दिनचर्या पाळणे महत्त्वाचे आहे. परंतु, काही आयुर्वेदिक झाडांचा आपण समावेश करु शकतो. त्यातील एक कृष्ण कमल. कृष्ण कमलचा चहा प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. चला, जाणून घेऊया त्याबद्दल सर्व काही-
'कृष्ण कमल' हे एक फूल आहे, जे जगातील सुंदर फुलांमध्ये पूजले जाते. इंग्रजीत 'कृष्ण कमल'ला 'पॅशन फ्लॉवर' म्हणतात. त्याचबरोबर 'कृष्ण कमल'ला राखी बेल असेही म्हणतात. हे फूल अनेक रंगांनी बहरते. कृष्ण कमळाची चवी कडू असली तरी ते थंड असते.
यात व्यसनविरोधी, दाहक-विरोधी, हायपोग्लायसेमिक, हायपोलिपिडेमिक, वेदनाशामक गुणधर्म आहेत, जे अनेक रोगांवर औषधाप्रमाणे काम करतात. विशेषत: उच्च रक्तदाबासाठी हे वरदानापेक्षा कमी नाही.
१. आपण निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असाल तर 'कृष्ण कमल' चहाचे सेवन करू शकता. त्यामुळे निद्रानाशापासून आराम मिळतो. त्याच वेळी, रात्री चांगली झोप येते.
२. मासिक पाळीदरम्यान पाठदुखी, थकवा, तणाव (Stress) यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. यासोबतच महिलांना होणाऱ्या पीएमएसमध्येही आराम मिळतो.
३. सध्याच्या काळात प्रत्येकाला नैराश्याने भरलेले जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर तणाव, चिंता आणि नैराश्याने त्रस्त असाल तर 'कृष्ण कमल' चहा अवश्य सेवन करा.
४. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी 'कृष्ण कमल' फायदेशीर (Benefits) आहे. तज्ज्ञांच्या मते, 'कृष्ण कमल' चहाच्या सेवनाने तणाव कमी होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यासाठी 'कृष्णकमळ' फुलाचा चहा बनवून सेवन करता येते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.