Omicron Symptoms: जाणून घ्या Omicron ची 20 लक्षणे कोणती आहेत...

कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य तज्ञ प्रत्येक Omicron चे लक्षणे ओळखण्याचा सल्ला देत आहेत जेणेकरून त्याला वेळीस रोखता येईल. यूकेच्या ZOE कोविड अभ्यासमध्ये ओमिक्रॉनच्या सर्व 20 लक्षणांची माहिती दिली आहे.
Symptoms Of Omicron
Symptoms Of OmicronSaam Tv
Published On

Omicron Symptoms: कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. बहुतेक कोरोना रुग्णांना Omicron Variantची लागण होत आहे अशी माहिती समोर येत आहे. ओमिक्रॉनचे लक्षणे सुरुवातीपासून वेगळे आहेत. त्यात अनेक बदल झालेलं दिसून आले आहे. तसेच ही लक्षणे प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसतात. यूकेचा ZOE कोविड अभ्यास ओमिक्रॉनच्या सर्व 20 लक्षणांची माहिती देतो आहे. यासोबतच ही लक्षणे शरीरात किती दिवसांनी दिसून येतात तसेच किती काळ टिकतात हेही सांगण्यात आले आहे. ओमिक्रॉनच्या बहुतांश रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसून येत आहेत- (Omicron Symptoms in Marathi)

Symptoms Of Omicron
Powai: IIT-मुंबईतील विद्यार्थांची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

ओमिक्रॉनची 20 लक्षणे-

1. डोकेदुखी

2. नाक वाहणे

3. थकवा

4. शिंका येणे

5. घसा खवखवणे

6. सतत खोकला

7. आवाजात बदल

8. थंडी वाजून येणे किंवा कुडकुडणे

9. ताप

10. चक्कर येणे

11. ब्रेन फॉग

12. वास बदलणे

13. डोळे दुखणे

14. स्नायूंमध्ये तीव्र वेदना

15. भूक न लागणे

16. वास न येणे

17. छाती दुखणे

18. ग्रंथींची सूज

19.अशक्तपणा

20. त्वचेवर पुरळ उठणे

हे देखील पहा-

ही लक्षणे किती काळ टिकतात?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची लक्षणे अधिक वेगाने दिसून येतात आणि त्यांचा Incubation Period ही कमी असतो. Omicron रुग्णांमध्ये, संसर्ग झाल्यानंतर 2 ते 5 दिवसांनी लक्षणे दिसतात. ब्रिटिश एपिडेमियोलॉजिस्ट टिम स्पेक्टर यांच्या मते, ओमिक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दीसारखीच असतात आणि ती सरासरी 5 दिवस टिकतात. तथापि, सध्या काही प्रमाणात लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे आकडेवारीवर मोठ्या प्रमाणात फरक पडत आहे आणि यामुळे फ्लूचे रुग्णही कमी झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com