New Features Of Whatsapp : Whatsapp च्या सिक्रेट फीचर्सबद्दल माहित्येय? फक्त 'या' यूजर्सना मिळणार लाभ

WhatsApp हे सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.
New Features Of Whatsapp
New Features Of Whatsapp Saam Tv

New Features Of Whatsapp : WhatsApp हे सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. अशा परिस्थितीत, व्हॉट्सअॅपच्या फीचर्सबद्दल सहसा सर्वांना माहिती असते. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्हॉट्सअॅप फीचर्सबद्दल सांगत आहोत, ज्याचा वापर काही निवडक लोकच करू शकतील.

वास्तविक व्हॉट्सअॅपची (Whatsapp) अनधिकृत आवृत्ती व्हॉट्सअॅप प्लस रेड म्हणून ओळखली जाते, जी दिसायला अगदी व्हॉट्सअॅपसारखीच आहे. पण या व्हॉट्सअॅपमध्ये अनेक सीक्रेट फीचर्स आहेत, ज्यामुळे तुमचा व्हॉट्सअॅप वापरण्याचा अनुभव बदलू शकतो. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

New Features Of Whatsapp
WhatsApp Update : इंटरनेटशिवाय चालणार व्हॉट्सॲप?; जाणून घ्या नवीन अपडेट

WhatsApp Plus Red इंस्टॉल करताना या गोष्टी लक्षात ठेवा -

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ही व्हॉट्सअॅपची अधिकृत आवृत्ती नाही. या प्रकरणात, व्हॉट्सअॅपवर बंदी घातली जाऊ शकते.

जर तुम्हाला फोनमध्ये व्हॉट्सअॅप प्लस रेड इन्स्टॉल करायचे असेल, तर तुम्ही आधी फोनवरून (Phone) अधिकृत व्हॉट्सअॅप अनइंस्टॉल करा. त्यानंतर ही आवृत्ती वापरावी.

New Features Of Whatsapp
WhatsApp Launching New Features : व्हॉट्सअॅपवर होणार 'हे' नवे फीचर्स लॉन्च, अनेक समस्या होतील दूर!

WhatsApp Plus Red कसे वापरावे -

स्टेप 1: प्रथम फोनवरून WhatsApp अनइंस्टॉल करा.

स्टेप 2: यानंतर तुम्हाला whatsplus.org वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

स्टेप 3: यानंतर व्हॉट्सअॅप प्लस रेड व्हर्जनची apk फाइल डाउनलोड करावी लागेल.

स्टेप 4: यानंतर तुम्हाला फोन नंबर टाकावा लागेल. आणि त्यानंतर पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

स्टेप 5: नंतर तुम्हाला प्रोफाईल पिक्चर निवडावा लागेल.

स्टेप 6: यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप प्लस रेड पर्याय निवडावा लागेल.

स्टेप 7: यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपचे सीक्रेट फीचर्स वापरू शकाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com