Allergies, Kids health, Child care
Allergies, Kids health, Child careब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kids Health Tips : मुलांना अॅलर्जी होतेय ? हे सामान्य आहे का ? याचे नेमके कारण काय ?

मुलांना कोणत्या प्रकारची अॅलर्जी होऊ शकते.
Published on

Kids Health Tips : मोठ्याच्या तुलनेत लहान मुले अधिक आजारी पडतात. त्यांना सतत सर्दी, खोकला, पुरळ, पोटदुखी, पेटके किंवा मळमळ यासारख्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल तक्रार करतात. त्याविषयी कधी विचार केला का?

हे देखील पहा -

मुले अनेकदा धूळीत किंवा मातीत खेळतात, त्यामुळे ते जंतूंच्या संपर्कात येतात. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला किंवा त्वचेला हानी पोहोचते. हा आजार असतो की, एखादी गंभीर अॅलर्जी याविषयी आपल्याला कळत नाही. अॅलर्जी ही दोन प्रकारची असते. सौम्य ते तीव्र प्रकारची असते. ही समस्या लहान मुलांमध्ये सर्वसामान्य असते. ह्या अॅलर्जीवर घरगुती उपचार करुन बरे करता येते किंवा परिस्थिती अधिक गंभीर असल्यास डॉक्टरांना भेट द्या. मुलांना कोणती अॅलर्जी होते हे जाणून घ्या.

१. हवेतील धूळ किंवा प्रदूषणामुळे (Pollution) यामुळे मुलांना अॅलर्जी होते. त्यामुळे त्यांना खाज सुटणे, शिंकणे यांसारखा त्रास होऊ लागतो. त्यासाठी पालकांनी याची योग्य ती खबरदारी घ्यावी.

Allergies, Kids health, Child care
Childhood Obesity : मुलांचे अचानक वजन वाढतेय ? आजार आहे की, आणखी कोणती नवी समस्या ? ह्याचे नेमके कारण काय ?

२. काही वेळेस मुलांनी कोणत्याही ठिकाणी स्पर्श केल्याने किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्याने त्वचेला अॅलर्जी होते. चिडचिड कमी करण्यासाठी सुती कपडे घाला आणि मुलांना (Children) कोमट पाण्याने अंघोळ घाला.

३. बऱ्याच मुलांना काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने अॅलर्जी होते. त्यामुळे आपले मुल काय खाते यावर लक्ष ठेवा तसेच या गोष्टीवर कायमस्वरुपी इलाज नसल्यास वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेत रहा. ज्यामुळे त्याचा त्रास कमी होईल.

४. काही मुलांना पाळीव प्राण्यांच्या फरची अॅलर्जी असते. या प्रकारची अॅलर्जी फक्त मूल आणि पाळीव प्राणी यांच्यातील पहिल्या संपर्कानंतरच दिसून येते. असे अॅलर्जीक भाग टाळण्यासाठी, आपले मूल आणि पाळीव प्राणी यांच्यात सुरक्षित अंतर असल्याची खात्री करा.

जरी यापैकी काही अॅलर्जी इतरांसारख्या गंभीर नसल्या तरीही, अॅलर्जीचे भाग टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com