Kidney Tumor : मूत्रपिंडाची गाठ कशी होते? याची लक्षणे कोणती? जाणून घ्या

Kidney Tumor Symptoms : रुग्णाला मळमळ आणि उलट्यांसह ओटीपोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होतात.
Kidney Tumor
Kidney TumorSaam Tv
Published On

नवी मुंबई:

एंजियोमायोलिपोमाचे सारख्या दुर्मिळ ट्युमरचे निदान झालेल्या ५६ वर्षीय रुग्णावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. रुग्णाला मळमळ आणि उलट्यांसह ओटीपोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होत असल्याची लक्षणे दिसून आली.

किडनीचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून अँजिओइम्बोलायझेशन करण्यात आले. डॉ. विकास भिसे( यूरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन )आणि डॉ. धार्मिक भुवा, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या टीमने या रुग्णाला नवे आयुष्य मिळवून दिले.

उलवे येथील रहिवासी असलेल्या श्रीमती साधना कोळी या रुग्णाला अचानक पोटाच्या उजव्या बाजूला वेदना, मळमळणे आणि उलट्या होऊ लागल्याने त्यांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची सोनोग्राफी करण्यात आली आणि सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये एंजियोमायोलिपोमाचे निदान झाले. मेडिकवर हॉस्पिटल्सने केलेल्या यशस्वी उपचारांमुळे रुग्णाचे प्राण वाचले.

नवी मुंबईतील कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन, मेडिकवर हॉस्पिटचे डॉक्टर विकास भिसे सांगतात की,रुग्णाला अँजिओमायोलिपोमा किडनीच्या (Kidney) सौम्य आणि दुर्मिळ अशा ट्यूमरचे निदान झाले. निदानाची खात्री करण्यासाठी तिची सीटी युरोग्राफी करण्यात आली त्यामध्ये हा ट्युमर फुटल्याचे दिसून आले.

Kidney Tumor
Kidney Cleansing Vegetables: किडनीच्या आजारावर रामबाण आहेत ५ भाज्या, शरीरात जमलेले विषारी पदार्थ काढूनच टाकतील

आत्तापर्यंत, एंजियोमायोलिपोमासंबंधीत केवळ केस स्टडी आढळून आल्या आहेत. हे स्त्रियांमध्ये सामान्यपणे आढळून येते आणि गर्भधारणेदरम्यान हा ट्युमर फुटणे सामान्य आहे.

डॉ भिसे पुढे सांगतात की, पारंपारिक नेफ्रेक्टॉमी पद्धतीच्या विरूद्ध अँजिओइम्बोलायझेशनचा पर्याय निवडण्यात आला. या ट्युमरमुळे रक्तवाहिनी अतिशय नाजूक झाली होती. इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. धार्मिक यांच्या मदतीने, रुग्णाला व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी (VIR) उपचार पुरविण्यात आले, ट्यूमरला पुरवठा करणारी रक्तवाहिनी ओळखून आणि किडनी काढावी लागू नये म्हणून ती रक्तवाहिनी ब्लॉक करण्यात आली. ही शस्त्रक्रिया 30 मिनिटे चालली आणि रुग्णाला घरी सोडण्यात आले.

Kidney Tumor
Parenting Tips : पालकांनो, मुलं सतत फोनवर YouTube पाहाताय? या ३ सेटिंग्ज आजच ऑन कराच; अन्यथा...

रुग्ण आता बरा झाला असून त्याचा ट्यूमरचा आकारही कमी झाला आहे. नेफरेक्टमी न करता रुग्णाची किडनी वाचविण्यात आली. वेळीच लक्ष न दिल्यास, ट्यूमरमधून रक्तस्त्राव आणि हेमेटोमा वाढणे यासारख्या गुंतागुंतीचा धोका होता. रुग्णालयात सर्व आवश्यक उपकरणे आणि आणि तज्ज्ञांमुळे रुग्णावर उपचार करण्यात आम्ही यशस्वी झालो.

किडनी ट्यूमर यशस्वीरित्या काढून टाकण्यात डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नाकरिता मी त्यांचे आभार मानते. पोटदुखी, मळमळ आणि उलट्या यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता याविषयी डॉक्टरांना द्यावी त्यामुळे कोणताही आजार (Disease) वेळीच ओळखता येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com