Kaju Katli Recipe : बाजारातली भेसळ असलेली मिठाई खाण्यापेक्षा घरीच बनवा काजू कतली; वाचा परफेक्ट रेसिपी

Kaju Katli Making Process : काजू कतली घरच्याघरी कशी बनवतात? त्याची सिंपल अन् सोपी रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.
Kaju Katli Making Process
Kaju Katli RecipeSaam TV
Published On

दिवाळी म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सण. हा सण प्रत्येक व्यक्ती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतो. दिवाळीमध्ये घरोघरी विविध प्रकारच्या मिठाई बनवल्या जातात. बाहेर दुकानात मिळणारी मिठाई भेसळयुक्त असते. अशी मिठाई लवकर खराब होते. जास्तीचे पैसे मिळावेत म्हणून मिठाई दुकानदार सर्रास मिठाईमध्ये भेसळ करतात.

Kaju Katli Making Process
Health Tips: तुम्हालाही सतत भूक लागतेय? मग हे वाचाच

भेसळयुक्त मिठाईचे सेवन केल्याने काही व्यक्तींना पोटाच्या विविध समस्या उद्भवतात. व्यक्ती आजारी पडतात. त्यामुळे आज बाजारातील भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरच्याघरी काजू कतली कशी बनवतात याची माहिती जाणून घेणार आहोत. काजू कतली ही प्रत्येकाची फेवरेट मिठाई आहे. त्यामुळे ही मिठाई खाण्यासाठी घरच्याघरी याची सिंपल अन् सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

काजू - १ कप

साखर - अर्धा कप

पानी - पाव कप

वेलची पावडर - १ ते २ चमचे

तूप - १ मोठा चमचा

चांदीचा वर्क - सजावटीसाठी

कृती

काजू कतली बनवणे फार सोपं आहे. त्यासाठी सर्वात आधी एका वाटीमध्ये काजू भिजत ठेवा. काजू किमान अर्धा तास तरी भिजले पाहिजेत. काजू भिजल्यावर ते एका सुती कापडावर काढून ठेवा. सुती कापडावर काजू ठेवले की त्यातील पूर्ण पाणी निघून जाऊद्या. काजू थोडे सुकवून घ्या आणि याची मिक्सरला बारीक पावडर करा.

मिक्सरला काजूची मस्त पावडर करणे महत्वाचे आहे. कारण काजू पूर्ण बारीक न झाल्यास त्याची परफेक्ट काजू कतली बनत नाही. त्यामुळे काजू मिक्सरला अगदी बारीक करून घ्या. काजू छान बारीक झाले की ती पावडर एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा. त्यानंतर वेलची सोलून घ्या आणि ती सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्या.

अशा पद्धतीने काजूची पावडर आणि वेलची पूड एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी आणि साखर मिक्स करा. गॅसवर हे उकळवून घ्या. साखर यात वितळल्यावर पाक तयार होईल. पाक तयार होताना तो एकतारी पाक होईपर्यंत साखर वितळवू नका. साखर पाण्यात मिक्स झाली की लगेचच गॅस बंद करा. तसेच यात काजूचे मिश्रण मिक्स करा. त्यानंतर एका प्लेटमध्ये हे सर्व सेट करून घ्या. तसेच नंतर यावर चांदीचा वर्क लावून घ्या. मिठाई थंड झाली की त्याचे त्रिकोणी काप करून घ्या. अशा पद्धतीने तयार झाली घरच्याघरी काजू कतली.

Kaju Katli Making Process
Diwali 2022 : यंदाची दिवाळी शुगर फ्री, मधुमेहांचे रुग्ण देखील चव चाखू शकतात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com