

रिलायन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. प्रत्येक महिन्यात जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते. यामध्ये ग्राहकांना प्रीपेड रिचार्ज प्लान, मोफत कॉलिंग तसेच डेटा, एसएमएस आणि ओटीटी सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते.
जिओने (Jio) आपल्या ग्राहकांना ७४९ रुपयांचा रिचार्ज प्लान आणला आहे. या प्रीपेड प्लानमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंग्सह दिवसाला २ जीबी डेटाचा लाभ मिळेल. याशिवाय १०० मोफत एसएमएसची सुविधा आणि ओटीटी (Ott) अॅप्सची सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे. या प्रीपेड प्लानसाठी दिवसाला तुम्हाला ८ रुपये खर्च करावे लागणार आहे.
1. जिओचा ७४९ रुपयांचा रिचार्ज प्लान
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना ७४९ रुपये (Price) खर्च करावे लागणार आहे. या प्लानमध्ये ९० दिवसांची वैधता आहे. या रिचार्ज प्लानसाठी दिवसाला अंदाजे ८ रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये व्हॉईस कॉलिंग आणि नॅशनल रोमिंगचा लाभ मिळतोय. या प्लानमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळतो. यामध्ये युजर्सना एकूण १८० जीबी डेटा मिळेल.
जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर यामध्ये अमर्यादित फ्री इंटरनेटचा लाभ मिळेल. या प्लानमध्ये दिवसाला १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो आहे. जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये जिओच्या ओटीटी अॅप्स, जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचे फ्री सबस्क्रिप्शन फ्री मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.