
जिओ कंपनीने ग्राहकांना चांगला रिचार्ज प्लान ऑफर केला आहे. ३०० रुपयांच्या नव्या रिचार्ज प्लान ऑफरमध्ये ग्राहकांना अनेक चांगले फायदे मिळत आहेत. या प्लानची जिओ आणि व्हीआयच्या 299 रुपयांच्या रिचार्जसोबत तुलना होत आहे. (Latest Marathi News)
व्हीआयच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड फ्री वॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळत आहे. तसेच Vi Hero Unlimited फायदेही मिळत आहे. व्होडाफोनच्या स्वस्त प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. या प्लानमध्ये एकूण ४२ जीबी हाय-स्पीड डेटा मिळत आहे. व्हीआय अॅपच्या माध्यमातून रिचार्ज केल्यास ५ जीबी डेटा मोफत मिळतोय.
जिओ कंपनी २९९ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी हायस्पीड डेटा देत आहे. या प्लानमध्ये लोकल आणि अनलिमिटेड एसटीडी कॉलिंगसोबत दररोज १०० एसएमएस मोफत मिळत आहेत. या ऑफरमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडीटी मिळत आहे. या प्लानमध्ये एकूण ५६ जीबी हाय-स्पीड डेटा मिळत आहे. तसेच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचं सब्सक्रिप्शन मोफत आहे.
जिओ आणि व्होडाफोनच्या २९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये इंटरनेट डेटाचं मोठं अंतर आहे. एकीकडे जिओ २९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ५६ जीबी डेटा मिळत आहे. तर त्याच किंमतीत व्हीआय ४२ जीबी डेटा देत आहे. दोन्ही प्लानमध्ये इतर बाबी सारख्याच आहेत. फक्त जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये १४ जीबी डेटा अधिक मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.