Jaw Pain : हिवाळ्यात तुमचा देखील जबडा दुखू लागतो ? दुर्लक्ष करु नका, असू शकते गंभीर समस्या

सर्दी, ताप, खोकल्यासारखा आजारांना आपण बळी तर पडतो पण त्यापैकी अजून एक दुखणे म्हणजे दात दुखणे.
Jaw Pain
Jaw PainSaam Tv
Published On

Jaw Pain : हिवाळा म्हटलं की, आपल्याला अनेक आजार जडतात. या काळात आपल्या शरीरावर विशेष परिणाम दिसून येतो. सर्दी, ताप, खोकल्यासारखा आजारांना आपण बळी तर पडतो पण त्यापैकी अजून एक दुखणे (Pain) म्हणजे दात दुखणे.

ऋतुमानातील बदलानुसार आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. आपण जे काही खातो किंवा पितो हे दातांच्या आधारावर परंतु, पण त्याचा थेट परिणाम होतो तो आपल्याला दातांवर. सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही जणांच्या जबड्यात वेदना सुरु होतात. तोंडाच्या आत वेदना सुरु झाल्या की, आपल्या नाकी नऊ येते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Jaw Pain
Child Teeth care : मुलांचे दात का किडतात ? दाताला पिवळसरपणा का येतो ? पालकांनी अशी घ्या चिमुकल्यांच्या दाताची काळजी

हे दुखणे का उद्भवते तर त्याचे मुख्य कारण व्यवस्थित दात साफ न करणे. तसेच रात्री जेवल्यानंतर दात न घासणे हे देखील याचे कारण आहे. जर तुमची अन्न चाऊन खाल्ले तर तुमचे शरीर निरोगी राहू शकते. जर तुमचे देखील दात सकाळी दुखत असतील त्याचे नेमके कारण काय असू शकते हे जाणून घेऊया.

1. दात एकमेकांवर घासणे

रात्री झोपेत दात घासण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. अनेक जण असे दिवसा देखील करतात. याचा परिणाम दातांवर होत नाही तर आपल्या जबड्यावर देखील होतो. यामुळे दातावर व त्याच्या आतीभागावर वेदना होतात. तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, लवकरच डॉक्टरांना भेटा.

2. दातात पोकळी निर्माण होणे

आपल्या तोंडात खराब बॅक्टेरिया जमा झाल्यास दातांच्या पोकळीची समस्या निर्माण होते. सतत गोड खाल्ल्याने किंवा दात व्यवस्थित साफ न केल्यामुळे ही समस्या तयार होते. हे सामान्य जरी वाटत असली तरी ते टाळण्यासाठी आपण दिवसातून दोन ते तीन वेळा दात स्वच्छ करायला हवे.

Jaw Pain
Morning Body Pain : सकाळी उठल्यानंतर अचानक पाठ दुखू लागते ? फक्त 'ही' गोष्ट करा, दुखणे कायमचे गायब

3. सायनसचा त्रास

जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर तुमचे दात देखील कधी कधी ठणकू लागतात. जबड्याच्या हाडाजवळ आणि वरच्या दातांच्या मुळांमध्येही सायनसची समस्या उद्भवते. हिवाळ्यात हा त्रास आपल्याला अधिक सुरु होतो, ज्यामुळे जबड्यांवर दाब येतो आणि तीव्र वेदना सुरु होतात.

4. हिरड्यांच्या समस्या

जबडा दुखण्याचे कारण हिरड्यांचे आजार (Disease) देखील असू शकतात. त्यामुळे हिरड्यांमध्ये सूज येऊ शकते. असे सतत होत राहिल्यास ती समस्या गंभीर ठरू शकते. तसेच हाडे देखील कमकुवत होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com