मुलांमध्‍ये दृष्‍टीदोषाचा त्रास वाढला; लॉकडाउनमधील ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम

मुलांमध्‍ये दृष्‍टीदोषाचा त्रास वाढला; कोरोनानंतरची समस्‍या
Jalgaon News Eye Problem
Jalgaon News Eye ProblemSaam tv
Published On

जळगाव : कोरोना काळात शाळा बंद असल्‍याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबली. या शिक्षण प्रणालीमुळे मुलांना फायदा झाला. परंतु, त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. लॉकडाउनमध्‍ये (Lockdown) सतत मोबाईल धरून राहिल्‍याने अनेक मुलांना दृष्टीदोषचा त्रास जाणवू लागल्‍याचे नेत्र तज्ञांच्‍या निदर्शास आले आहे. (Child Eye Problem After Corona)

Jalgaon News Eye Problem
Jalgaon News: भरपावसात कुटुंबाला अतिक्रमित जागा खाली करण्याची नोटीस

कोरोना (Corona) काळात शालेय मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण (Online Education) देत मुलांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना चांगले यश मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. एकीकडे असे सकारात्मक चित्र असताना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे काही दुष्परिणाम आता दिसू लागले असून, ऑनलाईन शिक्षण पद्धती काळात सातत्याने मोबाईलमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यस्त राहणाऱ्या (Jalgaon News) मुलांच्या दृष्टी दोषात वाढ झाल्याचे आता दिसून येत आहे. अनेक मुलांना जवळचे तर काही मुलांना दूरचे दिसण्यास अडचण येत आहेत. तर काहींना डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे अशा प्रकारचे विकारात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

पाच ते पंधरा वयोगटातील मुलांमध्‍ये त्रास

शाळकरी मुलांमधे पंधरा टक्‍के दृष्टीदोषात वाढ झाल्याचे म्हटले आहे. पाच ते पंधरा वयोगटातील मुलांमध्ये दृष्टीदोषमध्ये वाढ दिसत असली; तरी दृष्टीदोषांची लक्षणे दिसताच मुलाना नेत्रतज्ञांकडे तातडीने तपासणी करून उपचार घेतल्यास हे दोष दूर करणे शक्य असल्याचे डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. मात्र सौम्य लक्षणे असल्याने दुर्लक्ष केल्यास पुढील काळात या दोशात वाढ होऊन नोकरी व्यवसाय करताना अडचणी येऊ शकतात; असा इशाराही डॉ. पाटील यांनी दिला आहे.

मोबाईल हाती देणे टाळा

अनेक वेळा लहान मूल रडत असल्याचं लक्षात येताच पालक त्याच्या जवळ मोबाईल देतात. मात्र यातून लहानपणापासून दृष्टीदोष होण्याची शक्यता असल्याने लहान मुलांच्या हाती मोबाईल देणे टाळले पाहिजे; असा सल्लाही डॉ. पाटील यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com