

Multivitamins Benefits : आरोग्यासाठी मल्टीव्हिटॅमिन फायदेशीर मानले जाते. अनियमित जीवनशैली आणि आहार यामुळे शरीर कमजोर होऊन थकवा येते,चक्कर येणे अशा समस्या येतात.त्यावेळी डॉक्टर मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते
आपल्याला अशक्तपणा,थकवा यासारख्या समस्या येत नाहीत. प्रोटीन,मिनरल्स, व्हिटॅमिन अशा सर्व पोषक तत्वांची गरज शरीराला असते आणि शक्यतो हे सर्व पोषक घटक आपल्याला आहारातूनच मिळाले पाहिजे.
दगदगीच्या जीवनशैलीमुळे आपण योग्य आहार घेत नाही.बाहेरील फास्ट फूड (Food) जास्त प्रमाणात घेतात त्यामुळे आपल्या शरीराला हवे ते पोषक घटक आहारातून मिळत नाहीत म्हणून वेगळा मल्टीव्हिटॅमिन घेण्याची गरज शरीराला लागते. मल्टीव्हिटॅमिनची गरज पुढील तीन गुणांमध्ये समजून सांगितले आहे.
डॉक्टर सुरजित चॅटर्जी यांच्याकडून जाणून घेऊया मल्टीव्हिटॅमिन कमतरतेमुळे काय होते इंडियन एक्सप्रेसच्या बातम्यानुसार मल्टीव्हिटॅमिनमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व आढळतात जे शरीरासाठी पुरेसे आहे.
शरीरात पोषक घटकांची कमी झाल्यावर डॉक्टर (Doctor) मल्टीव्हिटॅमिन च्या गोळ्या देतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे पचन क्रिया बिघडते अनेक आजारांना सामोरे जावे लागते. स्त्रियांना गरोदरपणात अनेक समस्या निर्माण होतात.आपल्याला संसर्ग होतो आणि सर्दी-खोकला, हृदयाच्या समस्या,इम्युनिटी कमी होते इत्यादी समस्या निर्माण होतात.
1. मल्टीव्हिटॅमिन ची गरज कधी असते?
डॉक्टर सुरजित चॅटर्जी म्हणतात की, जेव्हा हवामान बदलते तेव्हा मल्टीव्हिटॅमिनची गरज असते. थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो त्यावेळेस मल्टीव्हिटॅमिन गरज भासते.अनेक लोक पोषकघटक असलेल्या योग्य आहार घेत नाही त्यांना मल्टीव्हिटॅमिन्सची जास्त गरज असते.
शाकाहारी लोकांना आहारातून शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत त्यामुळे त्यांना आवश्यकता असू शकते. थकवा आणि अशक्तपणाचे एकमेव कारण मल्टीव्हिटॅमिन असू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरच्या सांगण्यावरून मल्टीव्हिटॅमिन घ्यावे जर गरज नसताना मल्टीव्हिटॅमिन घेतल्याने अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.
2. अनावश्यक मल्टीव्हिटॅमिन्स घेण्याचे काही तोटे
गरज नसताना मल्टीव्हिटॅमिन्स घेतल्याने त्याचे अनेक तोटे होऊ शकतात. मल्टीव्हिटॅमिन्स काही विशेष वेळेस आवश्यक असते. व्हिटॅमिन बी,व्हिटॅमिन सी यासारखे जीवनसत्व पाण्यात सहज विरघळतात म्हणून हे जीवनसत्व विनाकारण घेतल्याने त्यातून नुकसान होत नाही.परंतु मल्टीव्हिटॅमिन्स इतर अनेक व्हिटॅमिन (Vitamins) ए ,व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन डी हे फॅटमध्ये विरघळणारे असतात.
त्यामुळे याचे विनाकारण सेवन केल्याने शरीराला गंभीर समस्यांचा सामना करावा लागेल. कॅल्शियम,मॅग्नेशियम आणि पोटॅशियम काही मल्टीव्हिटॅमिन्स मध्ये आढळतात जर याची गरज नसताना सेवन केले तर पोटदुखी,उलट्या, जुलाब,भूक न लागणे,केस (Hair) गळणे, त्वचा कोरडी, तोंडात मुंग्या येणे,वजन कमी होणे,मानसिक पाळीत बदल,चक्कर येणे, स्नायू दुखणे, लघवी मध्ये रक्त येणे, पाठदुखी, अंगावर सूज येणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.