Railway New Rules : तिकीट काढल्यानंतरही तुम्हाला भरावा लागेल दंड ! जाणून घ्या रेल्वेचे नियम

Railway New Guideline : जर तुम्ही तिकीट विकत घेतले असेल आणि प्लॅटफॉर्मवर फिरत असला तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
Railway New Rules
Railway New RulesSaam Tv
Published On

Indian Railway Rules : भारतीय रेल्वेतून अनेक लोक प्रवास करतात. प्रवास करण्यासाठी हे अधिक सुरक्षित मानले जाते. परंतु, जर तुम्ही तिकीट विकत घेतले असेल आणि प्लॅटफॉर्मवर फिरत असला तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवर ट्रेनची (Train) वाट पाहण्यासाठी देखील नियम आहे, त्याचे पालन न केल्यास दंड भरावा लागू शकतो. चला तर मग तुम्हाला रेल्वेचा असा नियम सांगतो, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही आणि त्यामुळे त्यांना दंड (Paying money) भरावा लागतो.

Railway New Rules
Indian Railway New Rules : AC कोचमधून प्रवास करणाऱ्यांना रेल्वे कंटाळली, जारी केले नवे नियम ! फॉलो न केल्यास भरावा लागेल दंड...लागेल दंड !

1. नियम

अनेकदा रेल्वेने प्रवास (Travel) करण्यासाठी आपण वेळेच्या आधी प्लॅटफॉर्मवर जाऊन थांबतो परंतु, तिकीट काढल्यानंतरही प्लॅटफॉर्मवर थांबण्यासाठी देखील वेळेची मर्यादा असते. रेल्वेचा हा नियम मोडल्यास आपल्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. चला तर मग आम्ही तुम्हाला रेल्वेच्या या नियमाबद्दल सांगतो.

2. प्लॅटफॉर्मवर थांबण्याबाबत नियम

  • तुमची ट्रेन जर दिवसाची असेल तर तुम्ही वेळेच्या २ तासाआधी प्लॅटफॉर्मवर पोहोचू शकतो.

  • तुमची ट्रेन जर रात्रीची असेल तर तुम्ही वेळेच्या ६ तासाआधी प्लॅटफॉर्मवर पोहोचू शकतो. यासाठी तुम्हाला दंड आकारला जाणार नाही.

  • त्याचवेळी, हाच नियम ट्रेनमधून उतरल्यानंतरही लागू होतो आणि दिवसा डिबोर्डिंग करताना, स्टेशनवर 2 तास थांबता येते, तर रात्री 6 तास असते.

  • यासाठी तुम्हाला तिकीट तुमच्याकडे ठेवावे लागेल आणि टीटीने मागितल्यास ते दाखवावे लागेल.

Railway New Rules
Indian Railways : नवजात बाळ आणि आईचा रेल्वे प्रवास होणार अधिकाधिक आरामदायी, कसं? जाणून घ्या

3. प्लॅटफॉर्म तिकीटही काढा

  • नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ रेल्वे स्थानकावर थांबल्यास प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागते.

  • जर तुम्ही दिवसा ट्रेनच्या वेळेपासून 2 तासांपेक्षा जास्त आणि रात्री ट्रेनच्या वेळेपासून 6 तासांपेक्षा जास्त वेळ थांबलात तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल.

  • तुम्ही असे न केल्यास, TTE तुमच्याकडून दंड वसूल करू शकते.

  • हे देखील लक्षात ठेवा की प्लॅटफॉर्म तिकीटची वैधता देखील केवळ 2 तासांसाठीच असते आणि यापेक्षा जास्त थांबल्यास तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com