Indian Air Force Day 2022: भारतीय वायूसेना दिवस का साजरा केला जातो ? जाणून घ्या त्याचे महत्त्व व ब्रीदवाक्य

यंदा एअरफोर्स डेच्या पार्श्वभूमीवर चंदीगडमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
Indian Air Force Day 2022
Indian Air Force Day 2022Saam Tv
Published On

Indian Air Force Day 2022 : भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे हवाई दल आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे असलेले हिंडन हवाई दल स्थानक आशिया खंडातील सर्वात मोठे आहे. भारतीय वायूसेना दिवस दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी भारतीय (India) वायूसेना आपली ताकद दाखवणार असून त्यासाठी हवाई दलाने विशेष तयारी केलेली असते. यंदा एअरफोर्स डेच्या पार्श्वभूमीवर चंदीगडमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलं आहे.

माहिती -

भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे हवाई दल आहे. गाझियाबादमधील हिंडन एअरफोर्स स्टेशन आशियातील सर्वात मोठा एअरबेस आहे. भारतीय हवाई दलाची स्थापना झाल्यापासून ते 'नभ: स्पृशम दीपम्' या आपल्या ब्रीदवाक्याचा मार्ग अवलंबत आहे. याचा अर्थ 'आकाशाला अभिमानाने स्पर्श करणे', असा होतो. वायुसेनेचे हे ब्रीदवाक्य भगवद्गीतेच्या ११ व्या अध्यायातून घेण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाचा रंग निळा, आकाशी निळा आणि पांढरा आहे.

Indian Air Force Day 2022
World Smile Day : जागतिक हास्य दिनानिमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status, द्वारे द्या आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा!

इतिहास -

भारतीय हवाई दलाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ रोजी झाली. भारतीय वायुसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या विमानाने १ एप्रिल १९३३ रोजी पहिले उड्डाण केले. त्यावेळी त्यात आरएफकडून प्रशिक्षण घेतलेले ६ अधिकारी आणि १९ हवाई सैनिक (शेकडो हवाई योद्धे) होते. असे म्हटले जाते की, ब्रिटिश साम्राज्याच्या वायुसेनेचे एकक म्हणून भारतीय वायुसेनेची स्थापना झाली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रॉयल हा शब्द त्याच्या नावात जोडण्यात आला पण स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये तो काढून टाकण्यात आला.

८ ऑक्टोबर १९३२ रोजी हवाई दल दिन साजरा केला जातो. या निमित्ताने हवाईदल आपल्या विशेष विमानांचा आणि सैनिकांचा पराक्रम करते. हवाई दल दिनानिमित्त दिमाखदार परेड आणि एअर शोचं आयोजन केलं जातं. स्वातंत्र्यापूर्वी वायुसेनेला आरआयएएफ म्हणजेच रॉयल इंडियन एअर फोर्स म्हटले जात असे. स्वातंत्र्यानंतर त्यातून केवळ "भारतीय हवाई दल" असा "रॉयल" हा शब्द काढून टाकण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय हवाई दलानेही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Indian Air Force Day 2022
World Smile Day : जागतिक हास्य दिवस का साजरा केला जातो? हसा आणि हसवत रहा

ब्रीदवाक्य -

देशातील सर्व लष्करांचे स्वतःचे ब्रीदवाक्य आहे. भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य आहे - 'नभ: स्पृशम दीपस्तंभ'. भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य गीतेच्या अकराव्या अध्यायापासून तयार झाले असून महाभारताच्या महायुद्धाच्या काळात कुरुक्षेत्राच्या रणांगणात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशाचा अंश आहे. या ब्रीदवाक्याने भारतीय हवाई दल आपली कामे पार पाडते.नभ: स्पृशम दीपस्तंभ' हे भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) अधिकृत ब्रीदवाक्य आहे, ज्याला भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २१ एप्रिल १९५९ रोजी मान्यता दिली.

भारतीय वायुसेनेचे महत्त्व

स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय हवाई दलाने चार युद्धे केली आहेत, ज्यात पाकिस्तानविरूद्ध तीन आणि चीनविरुद्ध एक युद्धे झाली आहेत. भारतीय हवाई दलाच्या इतर प्रमुख ऑपरेशन्समध्ये ऑपरेशन विजय - द एनेक्सियन ऑफ गोवा, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन पूमलाई, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक यांचा समावेश आहे. याशिवाय भारतीय हवाई दलाने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्येही सहकार्य केले आहे. भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे हवाई दल आहे.

भारतीय हवाई दलाची ताकद

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय वायुसेनेने एकूण 5 युद्धे लढली आहेत. यापैकी भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात चार तर चीनविरुद्ध एक युद्ध झाले. १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय हवाई दल सामील झाले. १९६२ मध्ये चीनबरोबर झालेल्या युद्धातही भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन कॅक्टस आणि बालाकोट एअर स्ट्राईक ही आयएएफची काही प्रमुख ऑपरेशन्स आहेत.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई-३० एमकेआय, मिराज २०००, मिग-२९, मिग २७, मिग-२१ आणि जॅग्वार या लढाऊ विमानांचा समावेश आहे. याशिवाय हेलिकॉप्टर प्रकारात हवाई दलाकडे एमआय-२५/३५, एमआय-२६, एमआय-१७, चेतक आणि चिता हेलिकॉप्टर्स आहेत, तर वाहतूक विमानांमध्ये सी-१३० जे, सी-१७ ग्लोबमास्टर, आयएल-७६, एए-३२ आणि बोईंग ७३७ या विमानांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com