Independence Day : पाकिस्तान दरवर्षी 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आले. भारतही त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला स्वतंत्र राष्ट्र झाला.
भारताच्या स्वातंत्र्यासह झालेला पाकिस्तान (Pakistan) आजतागायतही आर्थिक आणि विकासाच्या दृष्टीने वर्षानुवर्षे गरिबीत गेला आहे. जगभरातील देशांच्या यादितील भारत पाकिस्तानाला पाहताना, भारताकडे आदराने आणि पाकिस्तानकडे संशयाने पाहिले जाते. भारत आणि पाकिस्तानचे संबंध जगजाहिर आहेत. पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर नेहमीच तणावाचे वातावरण असते.
वास्तविक पाकिस्तान दहशतवाद्यांना राहण्यास परवाणगी देतो, तर भारत कारवाई करतो. जेव्हा पाकिस्तान जगाकडे आर्थिक मदत मागत फिरतो, तेव्हा भारत नैसर्गिक आपत्तीत जगाला मदत करतो. भारताची विकासगाथा आणि पाकिस्तानची गरिबी जाणून घेऊयात.
76 वर्षात पाकिस्तान भिकारी झाला
जगभरात पाकिस्तान 76 वर्षांत जगाला हसवणारा आणि भिकारी देश (Nation) बनला. आर्थिकदृष्ट्या कमकूवत असणाऱ्या पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपन्या विचार करतात. इतर मुस्लिम देशही या पाकिस्तानचा आदर करत नाहीत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा यूईए, सौदी अरेबिया आणि इजिप्तसह जगभरातील इतर मुस्लिम देशांना भेट देतात तेव्हा त्यांना खूप आदर आणि सन्मानाने वागवले जाते.
पाकच्या लष्करप्रमुखांनी मंचावरून स्वीकारले होते
अलीकडेच, पाकिस्तानचे लष्करप्रमुख (COAS) जनरल सय्यद असीम मुनीर यांनी कबूल केले होते की जगभरातील देश पाकिस्तानला भिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहतात. 'भिकेची वाटी फेकून द्यावी', असे ते एका कार्यक्रमात म्हणाले होते. जनरल असीम मुनीर म्हणाले की, आपण विदेशी कर्जावरील अवलंबित्व सोडून आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. असीम मुनीर यांचे हे विधान असेच आलेले नसून त्यांनी सांगितले गुगलवर भिकारी शोधल्यावर माजी पंतप्रधान इम्रान खान किंवा माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची छायाचित्रे दिसतात.
सौदी अरेबियाने पाक पंतप्रधानांना दिले खाजगी जेट
सप्टेंबर 2019 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान (Prime Minister) इम्रान यांना अमेरिकेला जाण्यासाठी सौदी अरेबियाने खासगी जेट प्रदान केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार सौदी क्राउन प्रिन्सने त्यांचे खाजगी जेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिले होते. यावरून तुम्हाला पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येऊ शकतो. ज्या देशात पंतप्रधानांकडे परदेशात जाण्यासाठी पैसे नाहीत आणि विमानाचीही सोय नाही, त्या देशातील सर्वसामान्यांची अवस्था कशी असेल.
जगात भारताचा दबदबा
स्वातंत्र्यानंतर भारताचा सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास झाला. आज परिस्थिती अशी आहे की जगभरातील देशांना भारतात गुंतवणूक करायची आहे. अनेक देशांनी गुंतवणूकही केली आहे. आज जगातील देश भारताकडे अपेक्षेच्या नजरेने पाहतात.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही देशात गेले तरी त्यांचे भव्य स्वागत होते. तिथली सरकारेही त्यांचा सर्वोच्च पुरस्कार भारताच्या पंतप्रधानांना देतात. सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. संरक्षण क्षेत्रातही भारताने झपाट्याने प्रगती केली आहे. अंतराळ क्षेत्रातही भारताने अनेक कामगिरी केली आहे. आता इस्रोकडून इतर देशांचे उपग्रहही प्रक्षेपित केले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.