Child Depression : हल्ली लहान मुलांमध्ये गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकतीच अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. त्यातच शाळेचा अभ्यास न केल्यामुळे शिक्षा मिळेल यामुळे मुलांने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली आहे.
लहान मुले म्हटली की, पालकांना त्यांच्याबाबत अधिक प्रेमाने तर कधी तरी सक्तीने वागावे लागते. कोरोनाच्या काळात दोन वर्ष तरी मुलांनी घरातून अभ्यास केला. ऑनलाइनच्या माध्यमातून मुलांना शिकवले गेले परंतु, मुले ऑनलाइन अभ्यास करत होती का ? की, युट्युबसारख्या साइट्सवर ती गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालत होती हा प्रश्न पालकांना पडतोय.
बदलेल्या काळानुसार हल्ली पालक देखील आपल्या कामात अति व्यस्त असतात. त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. आई-बाबांचे प्रेम न मिळाल्यामुळे ते त्यांच्यापासून दूरावले जातात. ज्यांमुळे त्यांना नैराश्य येते. अशावेळी ते गुन्हेगारीला प्रवृत्त होतात असे डॉक्टरांचे मत आहे.
जेव्हा कधी ही नैराश्याबद्दल बोलणे होते तेव्हा सर्वात आधी आपण वृद्धांचा किंवा तरुणांचा विचार करतो व याकडे आजार म्हणून पाहातो. परंतु, लहान मुलांमध्येही नैराश्य येऊ शकते हे बहुतेक लोकांना माहीत नसते किंवा ते मान्य करायला तयार नसतात. जेव्हा मूल शांत आणि एकटे राहते तेव्हा पालकांना वाटते की ही त्याची सवय आहे, परंतु प्रत्येक वेळी असेच घडले पाहिजे असे नाही. तुमच्या मुलांमध्ये देखील अशी काही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही त्यांची मदत करा. त्यांना नैराश्यातून बाहेर काढा.
नैराश्याचे प्रकारही अनेक
डिप्रेशनची (Depression) कारणे जशी वेगळी असतात, त्याचप्रमाणे त्याचे टप्पेही वेगळे असतात.
डिप्रेशन हे सौम्य, मध्यम व गंभीर स्वरुपाची असते.
मुलांची लक्षणे व मानसिक स्थिती यावर आधारित, मूल्यांकनाद्वारे, मूल नैराश्याच्या कोणत्या टप्प्यातून जात आहे हे निश्चित केले जाते.
मुलामध्ये नैराश्याची लक्षणे कशी दिसून येतात
मूल सतत एकटे किंवा उदास राहते
कमी बोलणे किंवा बोलताना सतत निराश वाटणे
विनाकारण चिडचिड किंवा रागराग करणे
झोपण्याची स्थिती बदलणे किंवा सतत झोपून राहाणे
खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे, अभ्यास किंवा कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येईल
वारंवार डोकेदुखी आणि पोटदुखीची तक्रार
थकवा आणि कमकुवत वाटणे
आंघोळ करणे, शाळेत (School) जाणे, गृहपाठ करणे इत्यादी दैनंदिन कामे त्याला नीट करता येत नाहीत.
मुलांना नैराश्य का येते?
हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडलेला असतो. परंतु, मुलांना असे कोणते टेन्शन येते ज्यामुळे ते सतत नैराश्याला बळी पडतात. या प्रश्नाचे उत्तर देणे खरेतर कठीण आहे. याची कारणे देखील भिन्न असू शकतात. ज्याबद्दल जाणून घेऊया
आनुवंशिक
प्रसूती दरम्यान कोणतीही समस्या
गर्भधारणेदरम्यान माता सुईसारख्या विषाच्या संपर्कात आली तर
घरातील खराब वातावरण
पालकांमधील मतभेद
मूल गुंडगिरीला बळी पडते
मूल लैंगिक शोषणाचा बळी ठरते
मुलाच्या मनात कोणत्या तरी गोष्टीवरुन भीती निर्माण झाली असेल तर
अशावेळी पालकांनी मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा किंवा डॉक्टरांनी संपर्क साधावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.