Super Foods
Super Foods Saam Tv

Super Foods : तुमच्या आहारात 'या' सुपरफूड्सचा समावेश करा आणि दीर्घायुष्यी व्हा

Super Foods Add In Diet : धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ नाही.

Super Food Benefits : धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ नाही. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवते आणि अनेक आजार उद्धभवण्याची शक्यता वाढते. म्हणून योग्य आहार घेणे फार गरजेचे आहे.

तर काही लोक आपल्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करणायचा प्रयत्न करत असतात. मात्र, आरोग्यासाठी आवश्यक सर्वच पोषक घटक त्या अन्नपदार्थातून मिळत नाहीत. म्हणून अशा परिस्थिती आज आम्ही तुम्हाला अशा काही सुपरफुड्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे आरोग्याला (Health) आवश्यक सर्व पोषक घटक मिळण्यास तुम्हाला मदत होईल.

Super Foods
Morning Super Food : रोज सकाळी उकडलेले हिरवे मूग खाल्यास आरोग्याला होतील 'हे' 5 फायदे

सुपरफुड म्हणजे काय?

ज्या अन्नपदार्थ भरपूर प्रमाणात पोषक घटक उपलब्ध असतात. त्यांना सुपरफुड (Superfoods) असे म्हणतात. याचा अर्थ असा होतो की सुपरफुडमध्ये शरीरात पोषक घटकाचे प्रमाण कमी कॅलरीजमध्ये पूर्ण करणायची ताकद असते. सुपरफुडमध्ये जीवनसत्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

1.ब्लूबेरी -

ब्लूबेरीमध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन, अँटिऑक्सिडंट्सचे मुबलक प्रमाण असते. यामुळे रक्तदाब कमी होतो. त्यासोबतच हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते.

Super Foods
Food Is Stuck In Child's Throat : लहान मुलांच्या घशामध्ये अन्न अडकले असेल तर, लगेच हे करा

2. गोजी बेरी -

गोजी बेरीमध्ये खनिजे, फायबर, लोह, तांबे, अमीनो ॲसिड आणि प्रथिने आढळतात. त्यासोबतच यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे किडनी आणि डोळ्यांसाठी गोजी बेरी खूप फायदेशीर समजले जाते.

3. हिरव्या पालेभाज्या -

हिरव्या पालेभाज्यांना सुपर फूड म्हटले जाते. पालकमध्ये आणि हिरव्या पानांच्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन के हे जीवनस्त्व असतात. तसेच आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील असते.

4. नट -

बेस्ट प्रोटीन सोर्ससाठी नट्स उत्तम पर्याय आहे. अक्रोड, बदाम, काजू या नट्सचा समावेश तुम्ही आहारात करू शकता. या नट्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

5. सिड्स -

चिया सिड्स, सूर्यफुलाच्या बिया, भोपळा, फ्लेक्स सिड्स हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या सिड्सचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि कोलेस्ट्रोल या समस्येपासून आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही या सिड्स स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com