Cancer Treatment: IIT मद्रासचं मोठं पाऊल! जीनोम डेटामुळे कॅन्सरवरील उपचारांमध्ये होणार मोठा बदल

IIT Madras Cancer Treatment Genome Data: या नवीन तंत्रज्ञानामुळे केवळ उपचार अधिक प्रभावी होणार नाहीत तर रुग्णांना कमी वेदना आणि कमी खर्चात चांगले उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
Cancer
CancerSaam tv
Published On

मेडिकल सायन्समध्ये आजकाल मोठी क्रांती होताना दिसतेय. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर एक नवी उपचार पद्धती विकसीत करण्यात आली असून क्रांतीच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आलं आहे. आयआयटी मद्रासच्या शास्त्रज्ञांनी एक ऐतिहासिक पाऊल उचललं असून कॅन्सरच्या रुग्णांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे केवळ उपचार अधिक प्रभावी होणार नाहीत तर रुग्णांना कमी वेदना आणि कमी खर्चात चांगले उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

जीनोम अ‍ॅटलस लाँच

आयआयटी मद्रासने सोमवारी 'इंडिया कॅन्सर जीनोम अ‍ॅटलस' लाँच केलं आहे. हे कॅन्सर संशोधनाला चालना देणार आहे. या माध्यमातून कॅन्सरसारख्या आजारासाठी उपचार विकसित करणार आहे. आयआयटी मद्रासने २०२० मध्ये हा कॅन्सर जीनोम कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमांतर्गत, देशभरातील ४८० ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांच्या टिश्यूंच्या नमुन्यांचं विश्लेषण करण्यात आलं होतं. ९६० संपूर्ण एक्सोम टेस्ट पूर्ण करण्यात आल्या.

Cancer
Uterus cancer: गर्भाशय कॅन्सरच्या निदानासाठी ‘ही’ टेस्ट फायदेशीर; योग्य वयात कधी करावी, तज्ज्ञांचा सल्ला

संस्थेने हा डेटाबेस संशोधक आणि डॉक्टरांसाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिला. आयआयटी मद्रासचे डायरेक्टर प्रा. व्ही. कामकोटी यांनी सांगितलं की, आम्हाला आशा आहे की या डेटामुळे कॅन्सरची कारणं सखोलपणे समजून घेण्यास मदत होणार आहे. सुरुवातीच्या पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. भारतातील विविध प्रकारच्या कॅन्सरची जीनोम माहिती पूर्ण करण्यासाठी हे अ‍ॅटलस उपयुक्त ठरणार आहे.

Cancer
Lung Cancer : फुफ्फुसांच्या कॅन्सरची शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं; 99 टक्के लोकं करतात इग्नोर

या स्टडी दरम्यान आयआयटी मद्रासने मुंबईत असलेल्या कार्किनोस हेल्थकेअर, चेन्नई ब्रेस्ट क्लिनिक आणि कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ ट्रस्ट, चेन्नई यांच्या सोबत हे काम केलं. या संस्थांनी भारतीय ब्रेस्ट कॅन्सरच्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या अनुवांशिक बदलांचं विश्लेषण करून एक सारांश तयार केला.

Cancer
Stomach cancer : सकाळी वॉशरूममध्ये दिसून येतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; शरीरातील बदल ओळखून वेळीच डॉक्टरांची मदत घ्या

कसं आहे भारतात कॅन्सरचं प्रमाण?

भारतात आणि जगात कॅन्सरचे रूग्ण वाढतायत. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, या आजाराने ग्रस्त लोकांची संख्या सतत वाढताना दिसतेय. राष्ट्रीय कॅन्सर नोंदणी कार्यक्रमानुसार, भारतातील प्रत्येक ९ पैकी १ व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता असते. सध्या १४,६१,४२७ लोक कॅन्सरने ग्रस्त असल्याची माहिती आहे.

Cancer
World Cancer Day: तरुणींमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय? लक्षणं कशी ओळखावी, तज्ज्ञांनी दिली माहिती

१२ टक्क्यांनी कॅन्सरच्या रूग्णांमध्ये वाढ

२०२२ पासून दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांमध्ये १२.८% वाढ होतेय. कॅन्सरच्या या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी, भारतात कॅन्सर संबंधित जीनोम अभ्यासांची संख्या आतापर्यंत कमी आहे. भारतात होणाऱ्या कॅन्सरच्या जीनोमिक डेटाच्या कमतरतेमुळे, अनुवांशिक वैशिष्ट्यं ओळखली गेली नाहीत. त्यामुळे त्यांची यादी तयार केली गेली नाही. परिणामी कॅन्सर शोधण्याचं किट बनवता आले नाहीत किंवा प्रभावी औषधे विकसित करता आली नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com