Budget Friendly Car : पहिल्यांदा कार घेताय? तर या आहेत जबरदस्त मायलेजसह बजेट फ्रेंडली कार

Tata Tiago Car : अनेकदा आपण पहिल्यांदा कार घेताना बऱ्याचशा चुका करतो.
New Car
New CarSaam Tv
Published On

Budget Friendly Car List :

आजकाल सर्वांनाच कार घ्यायची असते. कार घेण्यासाठी लोक खूप सुरुवातीपासून बचत करतात. आपली स्वतः ची कार असावी अशी सर्वांचीच इच्छा असते. जर तुम्ही पहिल्यांदा कार घेत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.

अनेकदा आपण पहिल्यांदा कार घेताना बऱ्याचशा चुका करतो. परंतु याच चुका टाळण्यासाठी कोणती कार घ्यावी, त्यात काय फिचर्स असावे, बजेटमधील चांगली कार कोणती असे अनेक प्रश्न मनामध्ये असतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही बजेट फ्रेंडली आणि जबरदस्त फिचर्सबद्दल माहिती देणार आहोत.

New Car
ATM Cash Withdrawal: घाबरु नका! ATM मधून पैसे न काढता कट झाले? हे काम त्वरीत करा

Alto K10 : मारुती सुझुकीची Alto K10 ही एक बजेट फ्रेंडली कार आहे. ही कार 1.1लिटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. कारचे मायलेज २५ किमी प्रति लिटर तर सीएनजीवर ३६ किमी प्रति लिटर आहे. विशेष म्हणजे, ही कार चालवायला अत्यंत सोपी आहे. त्याचसोबत तुम्हाला कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनदेखील मिळते. कारचे स्पेअर्सही स्वस्त आहे. या कारची किंमत 3.99 लाख रुपये आहे. कारचा सर्व्हिस खर्च हा वर्षाला फक्त 5 हजार रुपये आहे.

Celerio : सेलेरियो ही मारुती सुझुकीची दुसरी बजेट फ्रेंडली कार आहे. या कारची रचना आणि डिझाइन ही एकदम वेगळी आहे. सेलेरियो कार ही सीएनजीवर 35 किमी प्रति किलोपर्यंत मायलेज देते. या कारमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. कारची किंमत 5.36 लाख रुपयांपासून सुरू होते.

Tata Tiago : टाटा हे कार उत्पादन कंपन्यामधील सर्वात मोठे नाव आहे. टाटाची Tata Tiago ही कार अत्यंत बजेट फ्रेंडली आणि दमदार आहे. या कारला 4 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन पर्यांयामद्ये उपलब्ध आहे. कारची किंमत 5.59 लाख रुपये आहे.

i10 Nios : जर तुम्हाला ट्रेंडी आणि नवीन मॉडेलची कार हवी असेल तर i10 Nios हा उत्तम पर्यय आहे. उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह ही कार सीएनजीमध्ये उपलब्ध आहे. ही कार सीएनजीवर 32 किमी प्रति किलो मायलेज देते. कारची किंमत 5.73 लाख रुपये आहे.

New Car
Ganesh Chaturthi Recipe 2023 : गणरायासाठी बनवा ड्राय फ्रुट्स मोदक एकदम सोप्या पद्धतीने, मिनिटात बनतील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com