Parenting tips : बाळाच्या पोटात दुखतय तर हे आयुर्वेदिक उपाय करुन पहा

बाळाचे पोटदुखत असेल तर काय कराल ?
Parenting tips, Child care
Parenting tips, Child careब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : लहान बाळाचे आरोग्य हे अधिक नाजूक असते त्यामुळे त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.

हे देखील पहा -

जन्मल्यानंतर बाळाला (Baby) बाहेरच्या वातावरणाची फारशी सवय नसते त्यामुळे आईचे दूध पिल्यानंतर बाळाला उलटी किंवा पोटदुखीचा त्रास होऊ लागतो. किंवा बाळाला अधिक दुध पाजल्याने देखील हा त्रास उद्भवू शकतो. जन्मलेल्या बाळाचे आतडे हे अधिक नाजूक असतात. त्यामुळे त्यांना पचनसंस्थेस त्रास होऊ लागतो. आईने खालेल्या प्रत्येक पदार्थांचा बाळाच्या आरोग्यावर चांगला व वाईट असा दोन्ही रित्या परिणाम होत असतो. ज्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागते. पोट दुखू लागल्यानंतर बाळ अधिर रडू लागते, चिडचिड करते किंवा काही खाण्यास मागत नाही अशावेळी आपण बाळाला काही औषधे देतो परंतु, आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या काही गोष्टी बाळाला दिल्या तर बाळाची पोटदुखी थांबू शकते.

१. बाळाचे पोट दुखत अलेस तर आपण बाळाला ओवा, बडीशेपला भाजून घ्या. त्याचा पावडर तयार करून त्याच हिंग व काळे मीठ त्यात घाला. चिमूटभर ही पावडर चमच्यात घेऊन त्यात पाण्याचे काही थेंब मिसळवा. यामुळे बाळाला पोटदुखी पासून आराम मिळेल.

Parenting tips, Child care
प्रवासात त्वचेची काळजी कशी घ्याल ?

२. खायच्या पानाच्या रसात आपण लंवग व गुळाला मिक्स करुन घ्या. हे दिवसांतून दोन वेळा आईच्या दुधात दिल्यास बाळाला पोटदुखी होणार नाही. तसेच जायफळला घासून पाण्यात (Water) किंवा आईच्या दुधात दिल्यास बाळाला पोटदुखी होणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com