रागात आपल्याला जास्त भूक लागत असेल तर जाणून घ्या त्यामागची कारणे

अधिक तणाव किंवा दु:खी असेल तर ते जंक फूड खातात. ज्यामुळे त्यांचा मूडही चांगला होतो.
to get rid of emotional eating, Food craving habit
to get rid of emotional eating, Food craving habitब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना राग आला की, तो शांत होईपर्यंत त्याच कामात लक्ष लागत नाही. त्याची सतत चिडचिड होऊ लागते.

हे देखील पहा -

खाण्यापिण्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे. परंतु, याच्या खाण्याच्या पध्दती चुकल्या तर आपल्याला आरोग्य अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीकडून किंवा कुठेतरी ऐकल असेल की, राग आल्यानंतर तो शांत करण्यासाठी मी आज जास्त पदार्थ खाल्ले किंवा आज मी जास्त जेवले. तसेच त्यापैकी असे लोकही आहे ज्यांना अधिक तणाव किंवा दु:खी असेल तर ते जंक फूड खातात. ज्यामुळे त्यांचा मूडही चांगला होतो. तज्ज्ञांच्या मते अन्नपदार्थ खाणे चांगले असते परंतु त्याचे अधिक प्रमाणात सेवन करणे आपल्या शरीरासाठी (Health) हानिकारक असू शकते. याला इमोशनल इटिंग असे म्हटले जाते. ही एक सामान्य गोष्ट आहे व यावर आपण वेळीच डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्याने उपचार करु शकतो. (Food craving habit)

लक्षण व कारणे (Symptoms and causes)

इमोशनल इटिंग हे आपल्यात असणाऱ्या नकारात्मक भावनेला शांत करण्यासाठी यांचा वापर सामान्यत: केला जातो. बहुतेक लोकांना असे वाटते की, यामुळे राग, भीती, संताप यांसारख्या भावनांना आपल्याला शांत करता येते पण हे खरे जरी असले तरी अति खाणे हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असते. ज्यामुळे आपले वजन वाढू शकते, मधुमेह व नैराश्य यांसारख्या आजारांना आपण बळी पडू शकतो.

to get rid of emotional eating, Food craving habit
Pregnancy Diet Chart : गरोदरपणातील या आहारांविषयी असणारे समज व गैरसमज जाणून घ्या

राग आल्यानंतर नेमके काय होते-

- जेव्हा आपल्याला भूक नसते पण काही तरी खाण्याची इच्छा होते.

- घरातील अन्नपदार्थ खाऊन देखील आपले मन भरत नाही व आपल्याला सतत जंकफूड खाण्याकडे आपले मन वळत असते.

- खाल्ल्यानंतर आपल्या पश्चातापाची भावना निर्माण होते तरी राग आवरता येत नाही.

- राग आल्यानंतर आपण काय खात आहोत व का खात आहोत याचे भान आपल्याला राहत नाही.

डॉक्टरांच्या मते इमोशनल इटिंगला हलक्यात घेऊ नका यामागे अनेक कारणे असू शकतात. यावर आपण विचार करुन त्याचे कारण शोधू शकतो. परंतु, बऱ्यापैकी लोक राग आल्यानंतर अति खात असतील तर त्यांना या गोष्टीची सवय जडते व यांचे रुपातंर आजारात बदलत जाते. यावर आपण वेळीच उपचार करायला हवा.

to get rid of emotional eating, Food craving habit
Heart Attack Symptoms : तुम्हाला देखील जाणवताय ही लक्षणे तर वेळीच सावधान व्हा !

काळजी कशी घ्याल ?

१. रागाच्या भरात आपल्या शरीरातील हार्मोन्स हे बदलत असतात. त्यामुळे आपल्या खाण्याची सवय लागते. यांचे कारण आपल्या शरीरातील साखर बाहेर पडत जाते यामुळे आपल्या खाण्याची इच्छा होत असते.

२. रागामध्ये आपल्या सतत भूक लागत असेल तर त्यासाठी इतर पर्याय शोधा ज्यामुळे आपले लक्ष खाण्याकडे जाणार नाही. अशावेळी आपले मन शांत होण्यासाठी मित्रांसोबत गप्पा मारा. स्वत:ला इतर गोष्टीत गुंतवूण ठेवा.

३. इमोशनल इटिंगच्या वेळी आपण काय खातो याकडे आपले लक्ष नसते. अशावेळी शक्यतो आपण आरोग्यदायी पदार्थ खायला हवे.

४. जर आपल्याला ताणतणाव असेल तर आपण अशावेळी मेडिटेशन करणे गरजेचे आहे. यामुळे आपल्याला रागावर नियंत्रण ठेवता येईल व नकारात्मक गोष्टीपासून दूर राहता येईल.

५. अशा व्यक्तींना आधाराची गरज असते. अशावेळी कुटुंबाने व मित्रमंडळींनी त्यांना समजून घ्यायला हवी.

६. इमोशनल इटिंगवर वेळीच आवर न घातल्यास आपल्याला त्याची सवय होऊ लागते. अशावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com