Banana Coconut Smoothie Recipe : उन्हाळ्यात मुलांसाठी बनवा हेल्दी बनाना कोकोनट स्मूदी, पाहा रेसिपी

banana Benefits : केळी हे फळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. हे फळ सगळ्या ऋतूमध्ये आपल्याला खाण्यास मिळते.
Banana Coconut Smoothie
Banana Coconut SmoothieSaam Tv

Banana Coconut Smoothie : लहान मुले फळ खाताना अगदी चवीने खातात किंवा कधी तरी नाक मुरडतात. त्यामुळे मुलांना फळे खाऊ घालताना पालकांच्या नाकी नऊ येते.

केळी (Banana) हे फळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. हे फळ सगळ्या ऋतूमध्ये आपल्याला खाण्यास मिळते. यात असणारे घटक मुलांच्या पोषणासाठी फायदेशीर (Benefits) ठरतात. मुलांनी फळांचे सेवन करावे यासाठी आम्ही तुम्हाला टेस्टी व हेल्दी अशी केळी कोकोनट स्मूदी रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊया त्याबद्दल

Banana Coconut Smoothie
Corn Methi Malai Recipe : सतत उकडलेले कॉर्न, मेथीची भाजी खाऊन कंटाळले ? मग डिनरला ट्राय करा कॉर्न मेथी मलाई, पाहा रेसिपी

1. साहित्य

  • 1 केळी

  • 1 चमचा व्हॅनिला एसेंस

  • 2 मिली मेपल सिरप

  • आवश्यकतानुसार पुदीन्याची पाने

  • 1 कप किसलेला नारळ (Coconut)

  • १ कप लो फॅट दही

  • 1/2 कप बर्फ

Banana Coconut Smoothie
Double Mango Panipuri Recipe : तुम्ही कधी डबल मँगो पाणीपुरी ट्राय केलीये ? पाहा रेसिपी

2. कृती

  • प्रथम केळी घ्या आणि त्यांची साले काढून टाका.

  • यानंतर केळीचे छोटे तुकडे करून एका भांड्यात ठेवा. आता नारळ किसून घ्या.

  • यानंतर चिरलेली केळी आणि किसलेले खोबरे मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा बारीक करून घ्या.

  • केळी आणि नारळ एकदा बारीक केल्यानंतर या मिश्रणात दूध घाला.

  • यानंतर व्हॅनिला पावडर, मध आणि बर्फाचे 2-3 तुकडे घाला आणि पुन्हा एकदा सर्व साहित्य व्यवस्थित बारीक करा.

  • तुमची कोकोनट स्मूदी तयार आहे.

  • दोन सर्व्हिंग ग्लासेसमध्ये घाला आणि वर एक किंवा दोन बर्फाचे तुकडे घाला.

  • केळी कोकोनट स्मूदी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

  • जर तुम्हाला चिल्क बनाना कोकोनट स्मूदी आवडत असेल तर स्मूदी बनवल्यानंतर साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर वापरा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com