Natural Soap : संत्र्याचे साल फेकून देण्यापेक्षा असा करा वापर, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा नॅचरल साबण

Easy Homemade Orange Peel Soap Recipe : संत्रे खाल्ल्यावर त्याची साले फेकून देण्याऐवजी त्यांचा वापर करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने केमिकल-फ्री साबण तयार करू शकता. हा घरगुती साबण त्वचेचा उजळपणा वाढवण्यासोबतच शरीराला दिवसभर सुवासिक ठेवण्यास मदत करतो.
HOW TO MAKE NATURAL SOAP AT HOME USING ORANGE PEELS
HOW TO MAKE NATURAL SOAP AT HOME USING ORANGE PEELS saam tv
Published On: 

बहुतेक लोक संत्री खाऊन त्याचे साल फेकून देतात, पण तुम्हाला हे माहित आहे का? संत्रीचे साल आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप उपयोगी असतात. तुम्ही संत्र्याच्या सालांचा वापर करून घरीच अगदी सोप्या पद्धतीने साबण तयार करू शकता. यासाठी जास्त पैसे किंवा साहित्याची गरज नसते आणि काही मोजक्याच गोष्टींच्या मदतीने हा साबण बनवता येतो.

साहित्य

हा साबण बनवण्यासाठी ताजे संत्र्याचे साल, थोडे साबण बेस ,थोडे पाणी आणि साबण जमवण्यासाठी सिलिकॉन मोल्डची आवश्यकता असते. मोल्ड उपलब्ध नसल्यास कागदाचे कप वापरले तरी चालतात.

साबण बनवण्याची पद्धत

साबण तयार करण्यासाठी सर्वप्रथम संत्र्याची साले स्वच्छ धुऊन घ्यावीत जेणेकरून त्यावरील घाण निघून जाईल. त्यानंतर साली बारीक तुकड्यांमध्ये कापून मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावीत. लक्षात ठेवा की पाण्याचे प्रमाण जास्त नसावे. हे मिश्रण बारीक चाळणीने किंवा सुती कपड्याने गाळून घ्यावे, ज्यामुळे सालांचे मोठे तुकडे वेगळे होऊन एक गुळगुळीत मिश्रण मिळेल.

HOW TO MAKE NATURAL SOAP AT HOME USING ORANGE PEELS
उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? मग रोज पिस्ता खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

आता साबण बेसचे छोटे तुकडे करून घ्यावेत. एका कढईत पाणी उकळायला ठेवून त्यावर एक वाटी ठेवावी आणि वाटीत साबण बेसचे तुकडे टाकावेत . यामुळे साबण बेस जळत नाही आणि हळूहळू वितळू लागतो. बेस पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात संत्र्याच्या सालांचे तयार केलेले मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करावे. हे मिश्रण मंद आचेवर साधारण १२ ते १३ मिनिटे सतत हलवत शिजवावे, जेणेकरून त्यात गाठी होणार नाहीत.

HOW TO MAKE NATURAL SOAP AT HOME USING ORANGE PEELS
Healthy Cooking : फक्त १ तमालपत्र बदलेल भाताची चव आणि आरोग्य! जाणून घ्या जबरदस्त फायदे

मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करून ते साबणाच्या मोल्डमध्ये ओतावे. मोल्ड नसल्यास मिश्रण थोडे थंड झाल्यावर पेपर कपमध्येही ओतू शकता. हे मिश्रण साधारण ३० मिनिटे किंवा ते घट्ट होईपर्यंत खोलीच्या तापमानावर किंवा लवकर जमण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. साबण पूर्णपणे जमल्यानंतर मोल्डमधून बाहेर काढावा, म्हणजेच तुमचा संत्र्याच्या सालांचा घरगुती साबण तयार होतो.

हा साबण तुम्ही आंघोळीसाठी वापरू शकता, ज्यामुळे शरीराला दिवसभर नैसर्गिक सुवास येत राहील. तसेच, संत्र्याची साले त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानली जात असल्याने या साबणाच्या वापरामुळे त्वचेवर चांगला उजळपणा येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.