How To Learn Scooty In One Day : एका दिवसात स्कूटी शिकायचीय? फॉलो करा या टिप्स

How Learn Scooty Without Cycle : अनेकांना सायकल कशी चालवायची हे माहित नसते आणि या भीतीमुळे ते स्कूटी चालवायलाही शिकू शकत नाहीत.
How To Learn Scooty In One Day
How To Learn Scooty In One Day Saam Tv
Published On

How To Ride Scooty for the First Time : अनेकांना सायकल कशी चालवायची हे माहित नसते आणि या भीतीमुळे ते स्कूटी चालवायलाही शिकू शकत नाहीत. त्यांच्या मनात एक भीती आहे की जर त्यांना सायकल चालवायची देखील माहित नसेल तर त्यांना स्कूटी कशी चालवता येईल, त्यामुळे अशा लोकांसाठी तूम्ही त्या स्टेप्स फॉलोकरून तुम्ही रायडर बनू शकता.

सर्वप्रथम, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्कूटी (Scooty) मोकळ्या मैदानावर घेऊन जाल, तेव्हा स्कूटीशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या. उदाहरणार्थ – चावी कुठे लावायची, त्यात पेट्रोल कुठून टाकले जाते, डिक्की उघडण्यासाठी चावी कशी फिरवायची, इंडिकेटर कसा द्यायचा, ब्रेक कसा दाबायचा. स्कूटी कशी सुरू करावी इ.

How To Learn Scooty In One Day
Maruti Suzuki New Scooty Launch : काय बोलता... सुझुकीच्या एकाच वेळी 3 स्कूटर लाँच, किंमतही अगदी परवडणारी

घरातील मोठ्या व्यक्तींची मदत घेता येईल -

सर्वप्रथम, तुम्हाला स्कूटी कशी चालवायची हे माहित असलेल्या व्यक्तीला सोबत घेऊन खुल्या मैदानावर जावे लागेल. तुमच्या घरातील कोणत्याही मोठ्या सदस्याला पकडा आणि स्कूटी शिकण्याची तुमची इच्छा व्यक्त करा किंवा तुम्ही गाडी कशी चालवायची हे जाणणाऱ्या मित्राची मदत घेऊ शकता.

खुल्या मैदानापासून सुरुवात करा -

सर्वप्रथम स्कूटी मोकळ्या जागेवर घेऊन जा आणि हळू हळू तिथे स्कूटी चालवायला शिका. सर्वप्रथम, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्कूटी मोकळ्या मैदानावर घेऊन जाल, तेव्हा तेथील स्कूटीशी संबंधित सर्व माहिती (Information) जाणून घ्या, म्हणजेच तुम्हाला स्कूटीची संपूर्ण तपासणी करावी लागेल. उदाहरणार्थ- चावी कुठे जोडली आहे, त्यात पेट्रोल कुठे टाकले आहे, डिक्की उघडण्यासाठी चावी कशी फिरवायची, इंडिकेटर कसा द्यायचा, ब्रेक कसा दाबायचा, स्कूटर कशी सुरू करायची इ. हे संपूर्ण जाणून घेतल्यावर स्कूटी चालवायची तयारी ठेवा.

How To Learn Scooty In One Day
Honda New Scooter : होंडाच्या नव्या टू व्हिलरचा टिझर आऊट! अ‍ॅक्टिव्हापेक्षा अधिक दमदार स्कूटर लवकरच होणार लॉन्च

एकदा तुम्हाला स्कूटीबद्दल प्राथमिक माहिती मिळाली की, तुम्ही घरातील मोठ्या सदस्याच्या मागे बसून तुमच्या पहिल्या राईडसाठी तयार होऊ शकता. स्कूटी स्टार्ट केल्यानंतर तुम्ही एक्सलेटर हळू हळू वाढवायला सुरुवात करा आणि बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. थोडं अंतर गेल्यावर स्कूटीवर तुमचा बॅलेन्स (Balance) तयार झाल्याचा थोडा आत्मविश्वास येईल. त्यावेळी तुम्हाला संयम आणि सतर्कता आवश्यक असेल हे लक्षात ठेवा. काही दिवस कमी स्पीडमध्ये स्कूटर हळू चालवल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल आणि आता तुम्ही रस्त्यावर चालायला तयार व्हाल.

रिकाम्या रस्त्यावर सराव करा -

रस्त्यावरून स्कूटी घेतल्यावर तुम्हाला ज्या गोष्टींचा सराव करावा लागतो, ती म्हणजे ब्रेक्स, डावीकडे आणि उजवीकडे कसे वळायचे आणि स्कूटी कशी चालवायची. काही दिवस मुख्य रस्त्यावर सराव करा, त्यानंतर तुम्ही रहदारीच्या ठिकाणी चालायला तयार व्हाल.

How To Learn Scooty In One Day
Honda Two-Wheelers : होंडाची ग्राहकांना नवी ऑफर ! बाईक खरेदी केल्यानंतर मिळणार 10 वर्षांची गँरटी...

रहदारीमध्ये जाण्यासाठी तयार रहा -

जेव्हा तुमचा मुख्य रस्त्यावर आत्मविश्वास वाढतो, तेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी स्कूटी चालवण्यास पात्र ठरता. कारण गर्दीच्या ठिकाणी कुठूनही लोक वाहनासमोर येऊ शकतात. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही स्कूटी रायडर बनता तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com