Kadi Pakoda : देसी स्टाइल कढी पकोडा रेसिपी; वाचा बनवण्याची सोपी आणि परफेक्ट पद्धत

Kadi Pakoda Recipe : देसी स्टाइल तुम्हाला कढी पकोडा बनवायचा असेल तर त्याची रेसिपी तुम्हाला येथे मिळेल. या पद्धतीने रेसिपी बनवल्यास घरात प्रत्येकाला त्याची चव आवडेल.
Kadi Pakoda Recipe
Kadi PakodaSaam TV
Published On

महाराष्ट्रात डाळ आणि भात हा जेवणातील ठरलेला पदार्थ आहे. प्रत्येक घरात दुपारी किंवा मग रात्री तरी डाळ भात बनवला जातो. आता रोज वरण खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळी देसी रेसिपी शोधली आहे. आज आपण कढी कशी बनवतात याची माहिती जाणून घेणार आहोत.

Kadi Pakoda Recipe
Banana Pakoda Recipe : शुगर आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'केळी पकोडे', जाणून घ्या रेसिपी

फक्त कढी भाताबरोबर छान लागते. मात्र अनेक व्यक्तींना याची चव आवडत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी कढी पकोडा कसं बनवायचं याची देखील रेसिपील आज आम्ही शोधली आहे. चला तर मग लगेचच जाणून घेऊ घरच्याघरी कढी पकोडा बनवायचा तरी कसा.

साहित्य

फुल फॅट घट्ट ताक - आर्धा लिटर

तूप - ३ चमचे

बेसन पीठ - २ वाटी

जीरेस- १ चमचा

हळद - १ चमचा

मीठ - चवीनुसार

मिरची - ४ ते ५

लसुण - ३ पाकळ्या

साखर - चिमुटभर

कोथिंबीर - ४ काड्या

कृती

सर्वात आधी एका भांड्यात बेसन पीठ घ्या. बेसन पिठामध्ये मीठ आणि हळद मिक्स करा. तसेच यामध्ये थोडं जिरं टाकून घ्या. त्यानंतर पाणी टाकून भजी करण्यासाठी बनवतात त्या प्रमाणात याचे बॅटर बनवून घ्या. पुढे एका कढईत तेल कडकडीत गरम करून घ्या. तेल गरम झालं की, त्यामध्ये भजी टाकून घ्या. भजी टाकताना ते सरळ तेलात सोडा. भजी आपल्याला चपटे वाटत असतील तर पीठ जास्त पातळ झालं आहे असं समजा आणि पीठ थोडं घट्ट करून घ्या.

त्यानंतर भजी बनवून झाले की, एक मिक्सरचे भांडे घ्या. यामध्ये लसुण, मिरची, कोथिंबीर, हळद आणि मीठ एकत्र मिक्सरला बारीक फिरवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात थोडं तूप घ्या. तुपामध्ये आधी जिरं टाका. त्यानंतर तयार मसाला यात टाकून घ्या. मसाला टाकला की गॅस लगेचच कमी करा. त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात ताक घ्या. ताकामध्ये थोडं बेसन पीठ मिक्स करा. असे केल्याने ताक घट्ट होते. आता फोडणीमध्ये हे ताक ओतून द्या.

ताकाला मस्त उकळी आली की गॅस कमी करा. त्यानंतर आपली कढी १० ते १५ मिनिटे शिजवून घ्या. कढी मस्त शिजली की पुढे गॅस बंद करा. त्यानंतर यामध्ये भजी सोडा. भजी तुम्ही जेवण करण्याच्या १० मिनिटे आधीच कढीत सोडून द्यावेत. अशा पद्धतीने तयार झाली टेस्टी कढी.

Kadi Pakoda Recipe
Bread Pakoda Recipe: नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा ब्रेड पकोडा; लहान मुलंही ताव मारतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com