Google Careers: तरुणांसाठी खुशखबर! गुगलमध्ये काम करण्याची संधी, असा करा अर्ज

Google Internship 2024 : करिअरसाठी एक मोठी संधी गुगलने उपलब्ध केली आहे.
Google Internship
Google InternshipSaam Tv
Published On

Google Internship For Engineering Students

हल्ली शिक्षणांच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत परंतु, नोकरीच्या संधी कमी आहेत. अशातच गुगल अनेक तरुणांचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार आहे. प्रत्येकाला मोठ्या आणि नावाजलेल्या कंपनीमध्ये काम करायची इच्छा असते. अशातच ही संधी अनेक तरुण वर्गाला गुगल देत आहे.

गुगलमध्ये काम करण्यासाठी सर्वजण इच्छूक असतात. परंतु गुगलमध्ये काम करण्यासाठी सर्वात आधी इंटर्नशिप करावी लागते. तुमच्या करिअरसाठी एक मोठी संधी गुगलने उपलब्ध केली आहे.

Google Internship
Air Force Recruitment 2023 : तरुणांसाठी खुशखबर! भारतीय हवाई दलात अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् कसा कराल अर्ज?

अनेकजण इंटर्नशिपच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. गुगलने इंजिनियरींग आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची नवीन संधी उपलब्ध केली आहे. यासाठी आवश्यक पात्रता आणि अर्ज कसा कराल याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पात्रता

कॉम्प्युटर सायन्स आणि संबंधित शाखेतील बॅचलर, मास्टर्स किंवा पदवी प्रोग्रामच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. इंटर्नशिपसाठी सॉफ्टवेअर इंजिनियरींगसाठी ही जागा आहे. यासाठी तुम्हाला गुगल इंटर्नशिपवर नोंदणी करावी लागेल.

इंटर्नशिपचा कालावधी

ही इंटर्नशिप जानेवारी २०२४ पासून सुरू होईल. यासाठी आताच अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची तारीख १ ऑक्टोबर आहे. इंटर्नशिपचा कालावधी २२ ते २४ आठवडे असेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी हैदराबाद किंवा बेंगळुरू येथे जावे लागेल. निवड झालेल्यांना प्रति महिना ८० हजार रुपये स्टायपेंड मिळेल.

पदवीशिवाय अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इतर तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्याा व्यक्तीला C, C+, Java, JavaScript, Python या कोडिंग भाषा येणे आवश्यक आहे.

Google Internship
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पासाठी बनवा यापद्धतीने झटपट मखर, सजावटीच्या खास आयडीया पाहा

अर्ज कसा करावा

  • अर्ज करण्यासाठी गुगलच्या careers.google.com. वेबसाइटला भेट द्या

  • तिथे इंटर्नशिप अर्ज करायचा पर्याय शोधा. त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमचा CV समाविष्ट करा.

  • यानंतर उच्च शिक्षण सेक्शनमध्ये जा. तिथे आवश्यक रकाने भरुन 'Now Attending' सिलेक्ट करा. त्यानंतर आवश्यक माहिती भरा.

  • तुम्हाला कोणत्या जागेसाठी अर्ज करायचा आहे त्याबाबत माहिती भरा.

Google Internship
Mera Bill Mera Adhikar Yojana : सरकार देतेय करोडपती बनण्याची संधी! या लकी ड्रॉमध्ये कसे व्हाल सहभागी? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com