
व्यायाम किंवा योगाभ्यास केल्याने शरीराला ऊब मिळते. यामुळे शरीरात ऊर्जा संचारते ज्यामुळे तापमान वाढते.अनेकदा लोक सकाळची कसरत किंवा योगा केल्यानंतर लगेच पाणी पितात किंवा नाश्ता करतात. अशा स्थितीत योगानंतर लगेच काही काम करू नये. जास्त शारीरिक हालचालींनंतर ताबडतोब पाणी पिणे किंवा खाणे टाळण्याचा सल्ला तज्ञ देतात. आंघोळीसाठीही हाच सल्ला दिला जातो. योगासने किंवा व्यायाम केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. जाणून घेऊया याचे कारण आणि योगानंतर किती वेळाने स्नान करावे.
योगाभ्यास किंवा सराव केल्यानंतर किमान ३० मिनिटांनी आंघोळ करावी. योगासने करण्यापूर्वी किंवा नंतर लगेच आंघोळ करू नये.
योगासने केल्याने शरीरात जी ऊर्जा संचारते त्यावर आंघोळीचा परिणाम होतो. योग केल्याने कधी शरीर गरम होते तर कधी थंड होते आणि लगेच आंघोळ केल्याने शरीराचे तापमान वाढू शकते असेही तज्ज्ञांचे मत आहे.
योगाभ्यास केल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने वायू, पित्त, कफ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तापमानातील बदलामुळे सर्दी-खोकलाही होऊ शकतो.
योगासन करण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीरातील थकवा कमी होतो आणि अंतर्गत ऊर्जा आणि लक्ष केंद्रित होते. याच्या मदतीने व्यक्ती अधिक एकाग्रतेने आणि उर्जेने योग करू शकते. मात्र योगाभ्यास करण्यापूर्वी लगेच आंघोळ करू नका. योगासने करण्यापूर्वी तुम्ही ३० मिनिटे आंघोळ करू शकता.
योगा केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि घाम येतो. ताबडतोब आंघोळ केल्याने पचनसंस्था कमजोर होऊ शकते. योगानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटात जडपणा, दुखणे आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. २०मिनिटांच्या योगाभ्यासानंतर हळूहळू पाणी प्या. योगासने केल्यानंतर किमान एक तासाने काही पौष्टिक अन्न सेवन केले पाहिजे. तेलकट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळावेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited by - अर्चना चव्हाण