चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध प्रकारचे उपचार आणि सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट वापरले जातात. परंतु त्वचेशी संबंधित काही समस्या आहेत ज्यामध्ये अशा उत्पादनांचा कोणताही परिणाम होत नाही. जास्त खर्च केल्याने पैसे वाया जातात आणि त्वचेत कोणताही बदल होत नाही. अशीच एक समस्या म्हणजे कपाळावरचे काळे डाग. जर तुम्हाला कपाळावरील काळेपणा दूर करायचा असेल तर तुम्ही रोज त्वचेची काळजी घ्या. पुढील गोष्टी वापरल्याने कपाळाचा काळेपणा निघून जाईल.
कच्चं दूध
कच्चं दूध कोणत्याही कोणत्याही कॅमिकल युक्त प्रोडक्टपेक्षा फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे डागही लवकर निघून जातात. कच्च्या दुधात गुलाबपाणी मिसळून कपाळावर लावा. पाच मिनिटे हळूहळू मसाज करा. यामुळे कपाळाचा काळेपणा दूर होईल.
मध आणि लिंबू
मध आणि लिंबू यांचे मिश्रण त्वचेला एक्सफोलिएट करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते. मध आणि लिंबाच्या रसाची पेस्ट कपाळावर लावा आणि पाच मिनिटे मसाज करा. यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.
काकडी
काकडी त्वचेचे सौंदर्य वाढवते. काकडी त्वचेला आर्द्रता प्रदान करते. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. काकडीचे तुकडे करा किंवा त्याचा रस काढा आणि चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटे राहू द्या. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
हळद
हळद प्रत्येक घरात असते. त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी हळद सर्वोत्तम आहे. हळद त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते. हळदीच्या वापराने ब्लॅकहेड्स सहज दूर होतात. यासाठी हळदीच्या पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून सोडा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By: Sakshi Jadhav