Wedding Rituals : तुम्हाला माहित आहे का? लग्नगाठ का बांधली जाते ? नववधुंसाठी ही रीत अधिक महत्त्वाची का ?

प्रत्येक धर्मानुसार लग्नामध्ये वेगवेगळ्या विधी व परंपरा आहेत.
Wedding Rituals
Wedding RitualsSaam Tv
Published On

Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नाच्या अनेक पद्धती आहे. विविध देशात विविध प्रकारे हा लग्न सोहळा अधिक थाटामाटात साजरा केला जातो. प्रत्येक धर्मानुसार लग्नामध्ये वेगवेगळ्या विधी व परंपरा आहेत.

हिंदू धर्मात होणाऱ्या लग्नाच्या पद्धती आपण पाळत जरी असलो तरी त्यातील बऱ्याच गोष्टींचे महत्त्व किंवा ती पद्घत का केली जाते हे माहित नसतं. लग्नाच्या या अनोख्या सोहळ्यात सगळ्यात महत्त्वाची व खास अशी पद्धत सात फेरे. सात फेऱ्याशिवाय हिंदू धर्मातील कोणतेच लग्न पूर्ण होत नाही. ही पद्धत अनेक काळापासून सुरु आहे. परंतु आपल्या सर्वांच एक प्रश्न पडला असेल की, सात फेरे घेण्याआधी लग्नगाठ का बांधली जाते.

त्याआधी आपल्याला लग्नगाठ म्हणजे काय ? त्याचा अर्थ काय आणि व त्याला इतके महत्त्व का दिले जाते. त्याशिवाय हिंदू धर्मातील लग्न (Wedding) अपूर्ण का असते. असे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील तर जाणून घेऊया त्याबद्दल

Wedding Rituals
Pre-wedding Photoshoot : कमी खर्चात प्री-वेडिंग शूट करायचे आहे ? मुंबईतील 'या' रोमँटिक ठिकाणांना भेट द्या

1. रंगाला ही अधिक महत्त्व

लग्नादरम्यान, वधु वर जेव्हा लग्नगाठ बांधतात, तेव्हा गुलाबी किंवा पिवळ्या रंगाच्या दुपट्ट्याला अधिक प्राधान्य दिले जाते. या रंगाना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहेत. तसेच हे शुभ कार्यात अधिक शुभ मानले जातात.

2. लग्नगाठ बांधण्याचा अर्थ काय ?

लग्नगाठ म्हणजे बंधन. जेव्हा आपण कोणत्याही नव्या नात्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणार असतो तेव्हा त्या दोघांमध्ये नाते सुरु होण्यासाठी ही पद्धत तयार केली गेली आहे. यामध्ये वधुच्या पदरासोबत व वराच्या दुपट्ट्यासोबत ही गाठ बांधली जाते. तसेच ही गाठ कधीही तुटू नये किंवा उघडू नये असे देखील सांगितले जाते.

3. लग्नगाठेचे महत्त्व काय ?

हिंदू (Hindu) धर्मात सात फेरे हा अत्यंत महत्त्वाचा विधी मानला जातो. लग्नाच्या मंडपात वधू वराचे हे गठबंधन लग्न झालेल्या वराच्या बहिणीद्वारे किंवा वधुच्या बहिणीद्वारे ही गाठ बांधली जाते. या बंधनात अधिक प्रेम व अतूट नाते असावे अशी त्यामागची भावना असते. हे गठबंधन पवित्र व स्वच्छ कापडाने बांधले जाते. कापड जितका पवित्र व स्वच्छ आहे तितकेच तुमचे नाते एकमेकांसोबत चांगले असावे असे सांगितले जाते.

4. या गोष्टी लग्नगाठीमध्ये बांधल्या जातात

लग्नगाठ बांधताना नाणी, फुले, तांदूळ, हळद, दुर्वा हे त्यात बांधले जाते. ज्यामध्ये नाण्याचा अर्थ हा कधीही दोघांवर संकट येऊ नये असे दर्शवितो. दोघांच्या नात्यात फुलासारखा गंध दरवळावा यासाठी फुलेही त्यात घातली जातात. हळद ही दोन्ही निरोगी असण्याचे प्रतीक आहे आणि दुर्वा म्हणजे दोन्ही नेहमी आपल्या नात्याबद्दल उत्साही असले पाहिजे. तर दुसरीकडे, तांदूळ हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की दोघांच्या वैवाहिक जीवनात अन्न आणि पैशाशी संबंधित कोणतीही समस्या कधीही येऊ नये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com