FD वर मिळत आहे 9 टक्क्यांहून अधिक व्याज, 50 महिन्यांसाठी करा गुंतवणूक, जाणून घ्या संपूर्ण माहिती

FD वर मिळत आहे 9 टक्क्यांहून अधिक व्याज, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bank FD
Bank FDSaamTv
Published On

Fd Interest Rates : भारतीय रिझर्व्ह बँकच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दरात कोणत्याही प्रकारे वाढ केलेली नाही. मे 2022 पासून सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केल्यानंतर यावेळी आरबीआयने व्याजदरात थोडी शिथिलता दिली आहे.

पण जर तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेवर जास्त व्याज मिळवायचे असेल, तर यासाठी भारतातील सर्वात मोठ्या NBFC रिटेल चेन श्रीराम फायनान्स लिमिटेडने (SFL) जुबली डिपॉझिट अंतर्गत एक विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या मुदत ठेव योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर 9 टक्क्यांहून अधिक व्याज दिले जाणार आहे.

महिला गुंतवणूकदारांना अतिरिक्त व्याज मिळेल

श्रीराम फायनान्स लिमिटेड महिला गुंतवणूकदारांना या एफडीवर 0.10 टक्के अतिरिक्त व्याज  (Interest) देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक महिला गुंतवणूकदारांना 0.60 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. श्रीराम फायनान्सने सांगितले की, नवीन व्याजदराचा लाभ 50 महिन्यांच्या नवीन आणि नूतनीकरण एफडीवर मिळेल. नवीन दर 5 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत. (Latest Marathi News)

Bank FD
India Coronavirus Update: कोरोनाची चौथी लाट येणार नाही? 'या' तारखेपासून कोरोनाचे रुग्ण होतील कमी! तज्ज्ञांनी केला मोठा दावा

श्रीराम फायनान्स सर्वसामान्यांना मुदत ठेवींवर जास्तीत जास्त 8.50 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर महिला ठेवीदारांना 8.61 टक्के दराने व्याज मिळणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने विद्यमान एफडीचे नूतनीकरण केले तर त्याला 8.77 टक्के दराने व्याज मिळेल आणि महिलांसाठी NBFC 8.88 टक्के दराने व्याज देईल.

या 50 महिन्यांच्या ठेवीवर पुरुष ज्येष्ठ नागरिकांना 9.04 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच श्रीराम फायनान्स महिला ज्येष्ठ नागरिकांना 9.15 टक्के दराने व्याज देत आहे.

कोणाला मिळणार 9.42 टक्के व्याज?

या योजनेअंतर्गत एखाद्या पुरुष ज्येष्ठ नागरिकाने एफडीचे नूतनीकरण केल्यास त्याला 9.31 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर महिला ज्येष्ठ नागरिकांना यासाठी 9.42 टक्के दराने वार्षिक व्याज मिळणार आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेड, भारतातील सर्वात मोठ्या NBFC पैकी एक, 43 वर्षे जुनी फर्म आहे. ही श्रीराम ग्रुपची उपकंपनी आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेडने जानेवारी महिन्यात मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली होती.

Bank FD
Best Car's Under 5 lakhs In India: कमी किंमत आणि जबरदस्त मायलेज, पाच लाखांपेक्षा कमी किंमतीत येतात 'या' कार्स; पाहा संपूर्ण लिस्ट

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली होती. नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने जनतेला दिलासा दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील सर्व बँकांनी त्यांच्या एफडी योजना आकर्षक बनवण्यासाठी व्याजदरात वाढ केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com