Travel In Manali : सुट्ट्या लागल्या की, सर्वांना वेध लागतात ते फिरायला जाण्याचे. आपल्यापैकी बहुतेक लोकं हे सोशल मीडिया साईट्वर सात्तत्याने सर्च करत असतात. वाढत्या उन्हाळ्यात आपण थंड हवेच्या ठिकाणांना अधिक प्राधान्य देतो. अशावेळी फिरायला नेमके जायचे कुठे हा प्रश्न पडतो.
अगदी शांत असणार ठिकाणं पण कमी बजेटमध्ये फिरण्याचा (Travel) प्लान करत असाल तर आपण मनाली सारख्या ठिकाणी जाऊ शकतो. दिल्ली, नॉयडा आणि चंदीगढ जवळ असल्यामुळे मनाली पर्यटकांची पहिली पसंत ठरते.
मनाली हे हिमाचल प्रदेशात वसलेले एक छोटे घनदाट जंगल, नदी, दऱ्या-खोऱ्यांनी सामावलेलं शहर आहे. मनाली आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अनेक सुंदर ठिकाणे आहेत. पण तुम्हला माहीत आहे का, की मनालीच्या आसपास अशी काही ठिकाणे (Place) आहेत ज्याच्याबद्दल अनेक लोकांना माहीत नाही. त्यामुळे या ठिकाणांना मनालीचे हिडन प्लेसेस म्हणणे चुकीचे ठरणार नाही. असे अनेक लोक आहेत जे दरवर्षी पर्यटनासाठी मनालीला जातात. जर तुम्ही देखील त्याच लोकांमधील असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी मनालीच्या या काही हिडन जागेबद्दल माहीती घेऊन आलो आहोत.
1. पल्लिकुहलः
मनालीपासून 27 मिनिटांच्या अंतरावर असलेलं पल्लिकुहल एक अतिशय सुंदर असं पर्यटनस्थळ आहे. इतर पर्यटन ठिकाणांच्या तुलनेत पल्लिकुहल कमी प्रसिध्द असले तरी येथील पर्यटकांची संख्या हळुहळु वाढू लागली आहे. हे मनालीच्या ऑफबीट ठिकाणांपैकी एक आहे.
2. मलाना :
मनालीपासून फक्त 2 ते 2.30 तासांच्या अंतरावर असलेल मलाना भारतीयांबरोबर (India) परदेशी पाहुण्यांसाठी ही पहिली पसंत ठरली आहे. इथे तुम्हाला दगड आणि लाकडाची अनेक सुंदर मंदिरे पहायला मिळतील.
3. थानेदार :
सफरचंद आणि चेरीच्या शेतीसाठी प्रसिध्द असलेलं 'थानेदार' हिमाचलपासून जवळ-जवळ 196 किमी अंतरावर आहे. मनालीवरुन थानेदारला जायला 3 तास 40 मिनिटांचा वेळ लागतो. येथे सफरचंदाची शेती व निर्यात मोठ्या संख्येने केली जाते. सफरचंदाबरोबर चेरीची शेतीही येथे मोठ्या प्रमाणात केली जाते.
4. सोइल :
हिमाचलपासून 37 मिनिटांच्या अंतरावर असलेलं सोइल तिथल्या उंच झाडांमुळे आणि स्वच्छ वातावरणामुळे प्रसिध्द आहे. मनालीवरुन इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला अर्धा प्रवास गाडीने व उरलेला प्रवास पायी करावा लागतो. कँपिंग प्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही.
5. सजला :
सजला मनालीपासून 28 मिनिटांच्या अंतरावर असलेलं एक सुंदर गाव आहे. हे गाव तिथली मनमोहक धरणं आणि विष्णु मंदिरासाठी प्रसिध्द आहे. मनालीपासून सजलापर्यंत येण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग करावी लागते. या गावी येणारा रस्ता हा जंगलातून गेल्यामुळे इथे येताना तुम्हाला वेगळा अनुभव मिळतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.