
मुंबई: आपण जर नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी (provident fund) कापला जात असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली तर चिंता करु नका. तुमच्या पीएफ (PF) खात्यातून तुम्ही घरबसल्या पैसे काढू शकता. ना कार्यालयाच्या चकरा मारायचं टेंन्शन आणि ना कर्ज काढण्याची झंजट. आपण आपल्या मोबाईलमधूनही पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी अर्ज करु शकता. कसं ते सविस्तर वाचा... (Here is how to withdraw PF money using UMANG app in 6 simple steps)
हे देखील पाहा -
१) सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये उमंग (Umang App) हे ॲप डाऊनलोड करा.
२) ॲपमध्ये सगळे डिटेल्स भरा
३) सर्च मेन्यूमध्ये EPFO सर्च करा
४) कर्मचारी केंद्रित' पर्याय निवडा त्यानंतर 'राईझ क्लेम' वर क्लिक करा आणि EPF UAN क्रमांक प्रविष्ट करा.
५) तुमच्या फोन नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा, पैसे काढण्याचा प्रकार निवडा आणि उंंमंग ॲपद्वारे सबमिट करा.
६) त्यानंतर तुम्हाला तुम्हाला क्लेम रेफ्रेंस क्रमांक पाठवला जाईल आणि तुम्ही तुमच्या क्लेमची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याचा वापर करू शकता. (Need money? Withdraw money from a PF account at home; See 6 simple steps)
लक्षात ठेवा:
या ई-गव्हर्नन्स पोर्टलद्वारे ईपीएफचा दावा करण्यासाठी, आधी खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.
१) स्वीकारलेले आणि सत्यापित केवायसी तपशील
२) आधार लिंक केलेला UAN नंबर
३) उमंग ॲपला आणि आधारशी लिंक केलेला फोन नंबर
उमंग ॲपची वैशिष्ट्ये आणि फायदे:
सोप्पं इंटीग्रेशन: उमंग ॲपसह वापरकर्ते आधार, DigiLocker आणि PayGov सह सर्व सरकारी सेवांसह एकीकरणाचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्रे कोठे आहेत ते देखील तपासू शकता आणि अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे ई-गव्हर्नन्स ॲप केवळ स्मार्टफोनपुरते मर्यादित नाही. तुम्ही ते डेस्कटॉप, टॅबलेट किंवा एसएमएसद्वारेही वापरू शकता.
ग्राहक सेवा: ग्राहकांच्या सेवेसाठी आणि तक्रार निवारणासाठी उमंग ॲपकडे एक समर्पित ग्राहक सेवा टीम आहे जे वापरकर्त्याला येणाऱ्या सर्व समस्या सोडवतो. सपोर्ट टीम आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत उपलब्ध असते.
सर्व सेवांसाठी एकच ॲप: उमंग ॲपची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 100 हून अधिक सरकारी सेवांसाठी एकच प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्ते विविध चॅनेलच्या श्रेणीचा वापर करून इंटीग्रेटेड प्लॅटफॉर्मवर एकाधिक सेवांचा लाभ घेऊ शकतात. तर मग आता तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली तर चिंता करु नका. उमंग ॲप डाऊनलोड करा आणि पीएफ काढण्यासाठी तयार व्हा.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.