Heart Attack: ४५ शीत हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं; ICMR चा दावा

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या अहवालानुसार, तरुणांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमुख कारण हृदयविकार ठरत आहे. गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढले असून ही चिंताजनक बाब मानली जात आहे.
Heart disease among Indians
Heart disease among Indianssaam tv
Published On

हार्ट अटॅकने होणाऱ्या अचानक मृत्यूंमध्ये आजकाल तरूणांचाही समावेश पाहायला मिळतो. AIIMS च्या एका अभ्यासात असं पाहायला मिळालंय की, एका वर्षात तपासलेल्या सर्व अचानक मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू 45 वर्षांखालील लोकांमध्ये झालेत. त्यापैकी अनेक जण पूर्णपणे निरोगी दिसत होते, पण घरात किंवा प्रवासादरम्यान ते अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

हा अभ्यास या महिन्यात Indian Journal of Medical Research मध्ये प्रकाशित झाला असून तो Indian Council of Medical Research (ICMR) च्या प्रोजेक्टचा भाग आहे. मे 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान AIIMS नवी दिल्लीच्या पॅथॉलॉजी आणि फॉरेन्सिक मेडिसिन विभागात हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये तपासलेल्या 2,214 पोस्टमार्टमच्या प्रकरणांपैकी 180 प्रकरणांमध्ये म्हणजे 8.1% अचानक मृत्यूची नोंद करण्यात आली. 18–45 वयोगटातील तरुणांमध्ये 103 मृत्यू झाला म्हणजे 57.2%. ज्यांचं सरासरी वय 33.6 वर्षे होतं आणि त्यात पुरुषांचं प्रमाण जास्त होतं.

30 वर्षांनंतर हृदय निरोगी ठेवण्यासाठी खास उपाय

AIIMS च्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागातील डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितलं की, तरुणांमध्ये 42.6% अचानक मृत्यू हे हृदयाशी संबंधित आजारांमुळे झाले. यामध्ये बहुतेक तरूणांना गंभीर कोरोनरी आर्टरी डिसीज होता. या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॉकेज होतात पण यापूर्वी कोणतीही लक्षणं दिसली नाही. याचा अर्थ असा की हृदयविकार शरीरात शांतपणे वाढत होता.

जीवनशैलीशी कशी ठरते कारणीभूत?

तपासलेल्या प्रकरणांमध्ये जीवनशैलीशी संबंधित धोके दिसून आले आहेत. तरुणांमध्ये मृत्यू झालेल्यांपैकी निम्म्याहून अधिक जण धूम्रपान करणारे किंवा मद्यपान करणारे होते. हे प्रमाण वृद्धांमध्ये दिसणाऱ्या प्रमाणासारखेच होतं. अभ्यासात अचानक मृत्यू आणि कोविड संसर्ग किंवा लसीकरण यांच्यात कोणताही महत्त्वपूर्ण संबंध आढळला नाही. 46–65 वयोगटातील प्रौढांमध्ये कोरोनरी आर्टरी डिसीजचा त्रास अधिक दिसून आला. ज्यामुळे 70% पेक्षा जास्त अचानक मृत्यू झाले होते.

PSRI हार्ट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. के. के. तलवार यांनी सांगितलं की, या अभ्यासातून अकाली कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये चिंताजनक वाढ दिसून येते. त्यांनी नमूद केलं की, अनेक अस्पष्ट मृत्यू हे कदाचित हृदयातील आनुवंशिक electrical disorders मुळे होतात. जे नियमित शवविच्छेदनात सापडत नाहीत. त्यामुळे जिनेटिक टेस्टिंग आणि कौटुंबिक तपासणीची गरज अधोरेखित होते.

संशोधकांनी इशारा दिला आहे की, तरुणांमधील अचानक मृत्यू कदाचित शरीरात असलेल्या छुप्या आजारांमुळे होतात. त्यामुळे लवकर निदान करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच धोकादायक घटना घडत असल्याने हा अभ्यास महत्त्वाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com