Heart Attack: नाईट लाईटमुळे हार्ट अटॅकचा धोका 56%; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
दिवसा आपल्याला घरात दिवे लावण्याची फारशी गरज भासत नाही कारण सूर्यप्रकाश इतका ज असतो की आपली बहुतांश कामे त्याच प्रकाशात सहज पार पडतात. मात्र संध्याकाळ होताच आपण घरातील दिवे लावतो आणि रस्त्यांवरही स्ट्रीट लाइट्स चालू होतात.
पण अलीकडील एका अभ्यासानुसार, संध्याकाळी घरातील सर्व दिवे चालू ठेवणं आरोग्यासाठी, विशेषतः हृदयासाठी, घातक ठरू शकतं. या अभ्यासात असं स्पष्ट झालं आहे की, संध्याकाळी किंवा रात्री तेजस्वी प्रकाशात राहणं हृदयविकाराचा धोका वाढवतो. काय आहे यामागचं कारण ते जाणून घेऊया
अभ्यास काय सांगतो?
जामा नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, रात्री घरात दिवे लावून ठेवणं सर्केडियन रिदमवर परिणाम करते. सर्केडियन रिदम म्हणजे शरीरातील नैसर्गिक घड्याळ, जे झोप, हार्मोन संतुलन आणि शरीरातील अंतर्गत प्रक्रिया नियंत्रित करतं.
ज्यावेळी या रिदममध्ये अडथळा येतो, तेव्हा हृदयाचं आरोग्य बिघडतं. प्रकाशाच्या प्रखरतेमुळे शरीराची ही नैसर्गिक लय विस्कळीत होते, ज्यामुळे गोंधळ, उच्च रक्तदाब आणि अनियमित हृदय ठोके यांसारख्या समस्या निर्माण होतात.
हृदयाला किती धोका असतो?
रात्री तेज प्रकाशात राहिल्यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका ३२%, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ५६% आणि हृदयाघाताचा धोका ३०% पर्यंत वाढतो. विशेष म्हणजे, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि चांगली झोप घेऊनही या धोक्यांपासून पूर्णतः बचाव होत नाही. यामुळे रात्रीचा प्रकाश आपल्या शरीरावर किती गंभीर परिणाम करतो हे लक्षात येते.
कसं करावं संरक्षण?
हृदयाचं आरोग्य टिकवण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे
संध्याकाळी घरातील दिवे डिम करा किंवा मंद प्रकाश ठेवा.
पडदे लावून बाहेरून येणारा प्रकाश रोखा.
झोपण्याच्या वेळेस फोनचा वापर टाळा, कारण स्क्रीनचा प्रकाशही सर्केडियन रिदमवर परिणाम करतो.
या छोट्या सवयी अंगीकारल्यास तुमचं हृदय तंदुरुस्त आणि निरोगी राहणार आहे. तुम्हीही आरोग्यदायी जीवन जगू शकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

