Benefits of Steam Cooking
Benefits of Steam CookingSaam Tv

Healthy Eating : उकडलेल्या भाज्या खाताय ? फॅशन आहे की, फॅड? जाणून घ्या

उकडवलेल्या भाज्या सर्वात आरोग्यदायी असतात का ? त्याचा फायदा कसा होतो ?
Published on

Healthy Eating : आपण जितका आरोग्यदायी आहार घेऊ तितकेच आपल्या शरीरासाठी चांगले असते. या चांगल्या आहाराची गुरुकिल्ली आपल्या स्वयंपाकघरातच आहे.

हल्ली वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. त्यात आपण उकडवलेल्या भाज्या खाण्याचा समावेश करतो.

उकडलेल्या भाज्या खाण्या म्हणजे तळण्याच्या बाबतीत जसे, उकळत्या किंवा स्वयंपाकाच्या तेल आणि चरबीच्या सहाय्याने अन्न शिजवले जात नाही. स्टीमर हे स्वयंपाकाचे महत्त्वाचे उपकरण आहे ज्यामध्ये अन्न वाफवले जाते.

Benefits of Steam Cooking
Benefits Of Potato Juice : बटाट्याचा रस प्यायल्याने होऊ शकते प्रतिकारशक्ती मजबूत, जाणून घ्या त्याचे अनेक फायदे

या प्रक्रियेमध्ये तेलाचा वापर होत नसल्यामुळे, पारंपारिक स्वयंपाकासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो. स्टीमर हे सहसा बंद केलेले भांडे असते ज्याच्या खालच्या भागात पाणी असते, तर वरच्या भागात अन्न वाफवण्याकरिता ठेवले जाते.

उकडवलेल्या भाज्या सर्वात आरोग्यदायी असतात का ? त्याचा फायदा कसा होतो ?

१. रोजच्या जेवणात आपण शिजवलेल्या अन्नाचा वापर करतो. परंतु, वाफवण्याच्या प्रक्रियेमुळे भाज्यांमध्ये आढळणारी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे टिकून राहतात. वाफवण्याने व्हिटॅमिन बी, थायामिन, नियासिन आणि व्हिटॅमिन (Vitamins) सी यांसारख्या विशिष्ट जीवनसत्त्वांची शक्ती वाढते. तसेच, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जस्त यांसारखी काही खनिजे देखील अबाधित राहतात.

२. वाफाळण्याची पद्धतीत तेलाची गरज नसते. अन्न शिजवण्यासाठी फक्त वाफेचा वापर केला जातो. तेलाचा (Oil) वापर करून शिजवलेल्या अन्नापेक्षा वाफाळून तयार केलेले अन्न चरबीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वजन कमी करणार्‍या प्रत्येकासाठी फायदेशीर आहे.

३. वाफवण्याच्या प्रक्रियेमुळे शिजवलेल्या भाज्या आणि फळे मऊ होतात. ज्यामुळे त्या सहज पचण्यायोग्य राहतात.

४. वाफवण्याच्या प्रक्रियेचा मुख्य फायदा म्हणजे अनेक भाज्या एकाच वेळी वाफवल्या जाऊ शकतात ज्याचा स्वाद बदलत नाही.

५. वाफाळण्याच्या पद्धतीने अन्न शिजवल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. वाफेच्या साहाय्याने अन्न पूर्णपणे तयार केले जाते. वाफाळण्याच्या पद्धतीमुळे तेलाचा वापर होत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढवणारे फॅट किंवा सॅच्युरेटेड शरीरात निर्माण होत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com