Health Tips : सावधान ! हिवाळ्यात सॉक्स घालून झोपण्याची सवय आहे ? आरोग्यासाठी ठरु शकते घातक

काहींना उबदार कपडे घालण्याव्यतिरिक्त, काही लोक आहेत जे रात्री झोपताना मोजे घालतात.
Health Tips
Health Tips Saam Tv

Health Tips : थंडीचा महिना सुरु होताच त्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. स्वत:ला उबदार ठेवण्यासाठी आपण अनेक उबदार कपडे घालतो. जितकी काळजी आपण दिवसभर घेतो तितकीच आपण रात्री देखील घेतो.

काहींना उबदार कपडे घालण्याव्यतिरिक्त, काही लोक आहेत जे रात्री झोपताना मोजे घालतात. थंडीत स्वतःला उबदार ठेवण्यासाठी बहुतेक लोक असे झोपणे पसंत करतात. अर्थात, हिवाळ्यात मोजे घालून झोपल्याने तुम्हाला उबदारपणा तर मिळतोच, पण त्यामुळे तुमच्या आरोग्याला (Health) अनेक प्रकारची हानीही होते, ज्याची बहुतेकांना कल्पना नसते. अशा परिस्थितीत जर तुम्हीही या सवयीचे बळी असाल तर आम्ही तुम्हाला रात्री मोजे घालून झोपण्याचे तोटे सांगत आहोत, जे ऐकून तुमची सवय लगेच बदलेल. (Wearing Socks While sleeping)

Health Tips
Diabetes Health Tips : हिवाळ्यात मधुमेहींना असा ठेवा आहार, अन्यथा वाढेल रक्तातील साखर

1. रक्ताभिसरणाची समस्या

जर तुम्ही झोपताना मोजे घालत असाल तर त्यामुळे तुमच्या रक्ताभिसरणात समस्या निर्माण होऊ शकतात. घट्ट मोजे परिधान केल्याने शरीरातील रक्तप्रवाह कमी आणि मंद होऊ शकतो, ज्यामुळे योग्य रक्ताभिसरणात समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला रात्री मोजे घालायचे असतील तर फक्त सैल मोजे घालण्याचा प्रयत्न करा.

2. शरीराचे तापमान वाढू शकते

रात्री झोपताना मोजे घातल्याने शरीराचे तापमान वाढू शकते. मोजे घालून झोपताना हवा नीट जात नसेल तर जास्त गरम होण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे तुमच्या डोक्यावर उष्णता वाढू शकते, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थही होऊ शकता.

Wearing Socks While sleeping
Wearing Socks While sleepingCanva

3. त्वचेशी संबंधित समस्या

हिवाळ्यात, बरेच लोक दिवसभर मोजे घालून फिरतात. याशिवाय जर तुम्ही रात्रीही मोजे घालून झोपत असाल तर तुम्हाला स्किन (Skin) ऍलर्जीची समस्या देखील होऊ शकते. इतकेच नाही तर अनेकांना नायलॉन सॉक्सची समस्या देखील असू शकते, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

4. हृदयावर परिणाम

रात्री मोजे घालून झोपल्याने तुमच्या हृदयावरही वाईट परिणाम होतो. खरं तर, घट्ट मोजे घातल्याने तुमच्या पायातील नसांवर दबाव पडतो, ज्यामुळे तुमचे हृदय रक्त पंप करण्यासाठी कठोर परिश्रम करते. यामुळे, कधीकधी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

5. झोपेची समस्या

झोपताना मोजे घातल्याने अनेकदा झोपेत समस्या निर्माण होतात. खूप घट्ट मोजे घातल्याने तुम्हाला अस्वस्थता येऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल आणि त्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होईल. म्हणूनच रात्री झोपताना मोजे काढले तर बरे होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com