Health tips : बीएमआयवरून स्‍नायूच्‍या आरोग्‍याचे मापन कसे कराल ? जाणून घ्या

बीएमआय मोठ्या प्रमाणावर का वापरले जाते?
BMI, Health tips
BMI, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

Health Tips : व्यक्तीची एकूण आरोग्याची स्थिती निर्धारित करण्यासाठी बॉडी मास इंडेक्स एक साधन म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वापरले जात आहे. वजन ते उंचीच्या या गुणोत्तराचे सोपे समीकरण वापरुन लोकांचे कमी वजन, निरोगी वजन, जास्त वजन किंवा लठ्ठ वजन असे वर्गीकरण केले जाऊ शकते. पण संशोधनातून असे समजले आहे की, हे आरोग्याचे सर्वोत्तम सूचक असू शकत नाही. यासाठी आपण खरोखर आरोग्यदायी आहोत की, नाही हे कसे ठरवायचे ? आरोग्याचे योग्यरित्या मापन केले जाण्याच्या खात्रीसाठी काही माहिती दिली आहे ती पाहूया

हे देखील पहा -

बीएमआय मोठ्या प्रमाणावर का वापरले जाते?

सहजपणे उपलब्ध होणारी ऑनलाइन (Online) बीएमआय साधने आणि सुलभ पद्धतीमुळे बीएमआय हे सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या आरोग्य निर्देशकांपैकी एक आहे. लठ्ठपणाच्या पातळ्यांचे मूल्यांकन करण्यामागे बीएमआयच्या परिणामकारकतेमुळे ही पद्धत व्‍यक्‍तीच्‍या आरोग्याची पातळी निर्धारित करण्‍यासाठी सुलभ व परवडणारी आहे. संशोधन साधन म्हणून बीएमआय वय, लिंग, लोकसंख्याशास्‍त्र आणि स्‍थानानुसार व्‍यक्‍तींचे फॅट मासवर आधारित मुलभूत विभागांमध्ये वर्गीकृत करण्यात मदत करते. पण या एकमेव व्‍हेरिएबलवर आधारित व्‍यक्‍तींचे वर्गीकरण करताना आरोग्‍य स्थिती निर्धारित करण्‍यामध्‍ये मर्यादा दिसून येऊ शकतात.

बीएमआय व्‍यतिरिक्‍त इतर पर्यायाचा शोध घेण्‍याची गरज

समान बीएमआय असलेल्या व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍यांच्‍या पातळ्या विभिन्‍न असू शकतात. बीएमआय शरीराच्‍या रचनेला लागू नाही किंवा स्‍नायू व चरबीचे गुणोत्तर घेत नाही. अॅथलीट्सच्‍या स्‍नायूंच्या वजनामुळे त्यांचा बीएमआय नेहमीच जास्त असतो. हा फरक व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍याची स्थिती निर्धारित करण्‍यासाठी नवीन तंत्रे विकसित करण्‍याच्‍या महत्त्वाला प्रकाशझोतात आणतो.

BMI, Health tips
Apple Cider Vinegar Side effects : वजन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर पिताय? तर होऊ शकतो हा गंभीर आजार

आरोग्‍याच्‍या मापनासाठी साधन म्‍हणून स्‍नायूशक्‍ती

आरोग्याच्या (Health) संपूर्ण घटकांमध्ये स्नायूचे कार्य हे महत्त्वपूर्ण असते. जेथे स्नायूंची हालचाल व संतुलन, शक्ती, रोगप्रतिकारशक्ती व जखम लवकर बरी करण्यामध्ये अंत्यत महत्त्वाची भूमिका बजावते. मेदांता गुरगाव येथील गॅस्‍ट्रोइन्‍टेस्‍टाइनल सर्जरी विभागाचे अध्‍यक्ष डॉ. आदर्श चौधरी सांगतात. आरोग्‍याचे मापन करताना आपण वर्तणूकीपेक्षा अनियंत्रित आकडेवारीवर भर देतो. आपण आरोग्‍यदायी व तंदुरूस्‍त दिसत असला तरी स्‍नायूशक्‍ती कमकुवत असेल तर आपल्या हातांचा वापर केल्याशिवाय किंवा काही आधार घेतल्याशिवाय खुर्चीमधून उठणे अवघड होऊ शकते. हालचालीसाठी, तसेच चयापचयासाठी स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम असणे महत्त्वाचे आहे. वयाची ४०शी ओलाडल्यानंतर दरवर्षाला आपल्या स्‍नायूशक्‍ती आठ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते. म्‍हणून स्‍नायू महत्त्वाचे आहेत आणि ते जीवनाच्‍या दर्जाशी संलग्‍न असल्‍यामुळे आरोग्‍य स्थितीचे उत्तम सूचक ठरू शकतात.

गेट स्‍पीड टेस्‍ट -

एमआरआय, डेक्सा स्कॅन्‍स आणि पोर्टेबल अल्ट्रासाऊंडसह व्‍यक्‍तीच्‍या स्‍नायूशक्‍तीचे मापन करण्‍याच्‍या अनेक पद्धती आहेत. तरीदेखील गेट स्‍पीड म्‍हणून प्रसिद्ध व्यक्तीच्या चालण्याच्या गतीचे मापन करणारी पध्दत डॉक्टरांना काही माहिती देऊ शकते. संशोधनामधून निदर्शनास येते की, गेट स्‍पीड चाचणी नकारात्‍मक आरोग्‍य निष्‍पत्तींचा अंदाज करण्‍यास मदत करू शकते आणि वृद्धांमधील आयुष्‍याच्‍या अपेक्षांशी संलग्‍न राहिली आहे. लहान अंतरापर्यंत चालण्‍याच्‍या गतीचे मापन करण्यासाठी ही चाचणी आरोग्य स्थितीबाबत माहिती मिळवण्याची प्रभावी पध्दत ठरु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com