Bleeding Eye Virus: भारतात आलाय ब्लिडिंग आय व्हायरस? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Bleeding Eye Virus: आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी.आंधळं करणारा व्हायरस भारतात आलाय...हा व्हायरस थेट डोळ्यांवर हल्ला करून नजर घालवतो असा दावा करण्यात आलाय. मात्र, खरंच असा कोणता व्हायरस आलाय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Bleeding Eye Virus
Bleeding Eye Virussaam tv
Published On

सावधान, आता ब्लिडिंग आय व्हायरसचा धोका निर्माण झालाय. ब्लिडिंग आय म्हणजे डोळ्यासह इतर अवयवांवर हा व्हायरस हल्ला करतो आणि माणसाला कमजोर करून टाकतो. हा भयानक व्हायरस तब्बल 17 देशांत आला असून, भारतातही आल्याचा दावा करण्यात आलाय.रवांडामध्ये या व्हायरसमुळे तब्बल 15 लोकांचा मृत्यू झालाय असाही दावा केलाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज पाहून तुम्हीही हैराण व्हाल...काय दावा केलाय मेसेजमध्ये पाहुयात.

व्हायरल मेसेज

ब्लिडिंग आय व्हायरस झाल्यास डोळ्यांना खाज सुटते, डोळ्यांची जळजळ होते आणि डोळ्यांच्या सफेद भागात रक्त गोठतं. डोळ्यातून रक्तस्त्राव होऊन नजर जाते. हा मेसेज व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय. ब्लिडिंग आय थेट डोळ्यांवर हल्ला करत असल्याचा दावा करण्यात आलाय.मात्र, या व्हायरसचा भारतात धोका आहे का? या व्हायरसमुळे मृत्यू होऊ शकतो का.? याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला

त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

ब्लिडिंग आय आजार हा मारबर्ग व्हायरसमुळे होतो

भारतात अद्याप या व्हायरसचा एकही रुग्ण नाही

वेळेत उपचार झाल्यास हा आजार पूर्ण बरा होतो

उपचार न केल्यास अवयवांमधून रक्तस्त्राव होऊन मृत्यू होतो

आजाराची लक्षणं दिसल्यास रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

सुरूवातीला या आजारात ताप येतो, डोके दुखते, उलट्या होतात.त्यानंतर साधारण 5-6 दिवसांनी डोळे लाल व्हायला सुरुवात होते...⁠मात्र, वेळेत उपचार घेतल्यास याचा धोका नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत डोळ्यांवर हल्ला करून आंधळा करणारा व्हायरस भारतात आल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com