वजन कमी करण्यासोबतच चिंच खाण्याचे भन्नाट फायदे जाणून घ्या...

चिंचेचा वापर अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो, पण तुम्हाला माहित आहे का, चिंच जेवणाची चव वाढवते तसेच शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.
वजन कमी करण्यासोबतच चिंच खाण्याचे भन्नाट फायदे जाणून घ्या...
वजन कमी करण्यासोबतच चिंच खाण्याचे भन्नाट फायदे जाणून घ्या...Saam TV
Published On

Health Benefits of Tamarind: चिंचेचा वापर घरांमध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. काही लोकांना अशी आंबट गोड चिंच खायला आवडते. तर तिकडे काही महिलांच्या स्वयंपाकघरात चिंच नेहमी आढळते. चिंचेची चटणी किंवा त्यापासून बनवलेले लोणचे सर्वांनाच आवडते. तोंडाला पाणी आणणाऱ्या चिंचेचे काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नसते. जाणून घेवूयात चिंचेचे आरोग्यदायी फायदे.

चिंचेचा वापर अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो, पण तुम्हाला माहित आहे का, चिंच जेवणाची चव वाढवते तसेच शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. चिंच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय वजनही झपाट्याने कमी होते. चिंचेमध्‍ये अँटीबॅक्टेरियल, अॅण्टी-ऑक्सीडेंट आणि अँटी-अस्थमॅटिक सारखे घटक असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासोबतच चिंच खाण्याचे भन्नाट फायदे जाणून घ्या...
मास्क संदर्भात वैज्ञानिकांचा नवा खुलासा; जाणून घ्या कोणता मास्क योग्य?

चिंच खाण्याचे फायदे

1. वजन कमी करण्यासाठी

चिंचेमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करते. त्यात फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल देखील असतात, जे शरीरातील चयापचय वाढवतात आणि वजन वेगाने कमी करतात.

2. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स देखील चिंचेमध्ये प्रचंड प्रमाणात आढळते. आपल्या शरीराची चयापचय क्रिया मजबूत बनवण्यासोबतच हे दोन्ही गुणधर्म आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. इतकंच नाही तर तज्ज्ञांच्या मते, चिंच फंगल इन्फेक्शन दूर करण्यातही खूप मदत करते.

3. हृदय निरोगी ठेवाण्यासाठी

चिंचेमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स, जे अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहेत, एलडीएल खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. जर तुम्ही चिंचेचे सेवन केले तर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

4. पचनसंस्था मजबूत ठेवते

इतकंच नाही तर चिंच खाल्ल्याने पचनक्रिया नीट राहते आणि त्यामुळे पचनसंस्था खूप मजबूत होते असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर यामध्ये असलेले पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडेंट शरीरातील जळजळ होण्याची समस्या दूर करते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com